छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त ३६८ रक्तदात्यांनी केले विक्रमी रक्तदान

ठाण्यातील सामाजिक संस्थांचे विक्रमी रक्तदान  
ठाणे -छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त  ठाण्यातील सामाजिक संस्थांनी आयोजित  केलेल्या रक्तदान शिबिर ला भरघोस प्रतिसाद लाभला आहे. विक्रमी ३४० जणांनी रक्तदान आणि २८ जणांनी प्लाझ्मा दान असे एकूण ३६८ जणांनी रक्तदान करून कोरोना लढ्यात सक्रिय सहभाग घेतला आहे.

कोरोना महामारीमध्ये  रुग्णांना रक्त आणि प्लाझ्माची निकड भासू लागली आहे. या कोरोना विरोधातील लढाई  फत्ते करण्यासाठी ठाण्यातील मराठा जागृति मंच पानिपत ठाणे विभाग, शिवराय प्रतिष्ठान,   कर्तव्य- एक सामाजिक जाणीव संस्था (महाराष्ट्र), नवयुग मित्र मंडळ, मावळा संघटना, झेप प्रतिष्ठान, मराठा क्रांती सेवा संघ, मराठा सामाजिक प्रतिष्ठान कळवा, कोलबाड मित्र मंडळ, छावा ढोल ताशा पथक ठाणे,सहयाद्री प्रतिष्ठान ठाणे, अखिल महाराष्ट्र देशमुख मराठा समाज, ठाणे,
पंचशील गणेशोत्सव मंडळ, मातोश्री प्रतिष्ठान, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय,मराठा उद्योजक लॉबी , ग्रँड मराठा.फाउंडेशन आदी  सामाजिक संस्थांतर्फे  छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त मावळी मंडळ शाळेत  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. पोलिस निरीक्षक अविनाश सोंडकर  यांच्या हस्ते सकाळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. त्यानंतर रक्तदान करण्यासाठी पहिल्यांदा रक्तदान करणाऱ्या तरुणी पासून ६० वर्षापर्यंत नागरिकांनी रक्तदान केले. काही अपंग व्यक्तींनी ही रक्तदान करून कोरोना लढ्यात उडी घेतली. यावेळी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त विश्वनाथ केळकर, ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. कैलास पवार, पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरें., वरिष्ठ पोलीस निरीक्षक गावडे, पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. माळगावकर, ठाणे जिल्हा डॉक्टर असोसिएशन चे अध्यक्ष डॉ.शशांक पवार,  सुहास देसाई आदींनी कार्यकर्ते आणि रक्तदात्याना शुभेच्छा दिल्या.

पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे, पोलिस निरीक्षक   दीपक पाटील, संकेत शिंदे, अनंत कांबळे,  तृषल सूर्यवंशी यांच्यासह अन्य पोलिसांनी ही रक्तदान केले.

सामाजिक संस्थांनी  आयोजित रक्तदान शिबिरात एवढया मोठया प्रमाणावर रक्तदान  होणे ही पहिलीच वेळ आहे. अशाप्रकारे तरुणांनी पुढे येऊन रक्तदान करणे ही कोरोंना काळातील गरज आहे.तसेच कुठलीही राजकीय  मदत न घेता सर्वसामान्य कार्यकर्ता यांनी केलेल्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक ठाणे पालिका अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख , पोलिस उपायुक्त अविनाश आंबुरें आणि जिल्हा शल्यचिकि्सक डॉ. कैलास पवार यांनी केले.

 448 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.