रूग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकांचा सत्कार करून पांडुरंग आमले यांनी त्यांच्या कार्याचा केला गौरव
नवी मुंबई : जागतिक परिचारिका दिनानिमित्त सानपाड्यात भाजपाचे युवा नेते पांडुरंग आमले यांच्या माध्यमातून परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. रूग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकांचा सत्कार करून पांडुरंग आमले यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना एकप्रकारे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
सानपाडा नोडमधील भाजपाचे युवा नेते समाजसेवक पांडुरंग आमले यांनी न्यू मिलेनियम हॉस्पिटल व एम पी सी टी हॉस्पिटल सानपाडामधील परचारिकांना छोटीशी भेटवस्तू देऊन परिचारिका दिन साजरा करताना त्यांना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. हंचाटे यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी भाजपाच्या पदाधिकारी आज्ञा गव्हाणे, रमेश शेटे, सुनील नाईक, सरनोबत, साई भक्त युवा वर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता.
स्वतःच्या जीवावर उदार होवून कोरोना काळात रात्र दिवस मेहनत करणाऱ्या परिचारिका यांच्या कार्याला सलाम करताना पांडुरंग आमले यांनी त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
535 total views, 1 views today