लोकमत परिवारातील दिवंगत कर्मचारयांच्या नातेवाईकांना मिळणार १० लाख रूपये

मुंबई – कोरोनामुळे मृत्युमुखी पडणारया लोकमत परिवारातील पत्रकार आणि करमचारयांच्या नजिकच्या नातेवाईकांना प़त्येकी दहा लाख रूपये देण्याचा निर्णय लोकमतने घेतला आहे.. अशा प्रकारचा निर्णय घेणारी लोकमत ही महाराष्ट्रातील पहिलीच मिडिया संस्था आहे . लोकमतच्या या निर्णयाबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी आनंद व्यक्त केला असून करण दर्डा आणि लोकमत परिवारास धन्यवाद दिले आहेत..
राज्यातील पत्रकार सरकारकडेच विविध मागण्या करीत असतात. पत्रकार खासगी संस्थेसाठी काम करीत असताना सरकारने काय म्हणून पत्रकारांना पेन्शन आणि अन्य सवलती द्याव्यात? असा सूर काही अधिकारी आणि लोक प्रतिनिधी लावत असतात. या पार्श्‍वभूमीवर मराठी पत्रकार परिषदेने माध्यम समुहाच्या मालकांनी आपल्या पत्रकारांना विमा कवच आणि दिवंगत पत्रकारांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई द्यावी असे आवाहन एका प़सिध्दी पत्रकाव्दारे नुकतेच केले होते .लोकमतने आज आपल्या परिवारातील दिवंगत पत्रकाराच्या, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना पुर्वलक्षी प्रभावाने १० लाख रूपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.. लोकमतचा हा निर्णय दिलासा देणारा आणि राज्यातील अन्य माध्यम समुहांनी अनुकरण करावा असा असल्याचे मत एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले आहे..
लोकमतने CARES (कोविड असिस्टन्स रिलीफ व सपोर्ट) योजनेअंतर्गत हा निधी देण्याचे नक्की केले असून त्यासाठी एका अधिकरयाची नियुक्ती केली आहे.

 368 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.