ठाणे – कोविडच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायूच्या टंचाई मुळे अनेक रुग्णांना प्रचंड त्रास होत आहे. तसेच प्राणवायूचा सिलिंडर मिळविण्यासाठी व नंतर तो रिफील करण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची प्रचंड वणवण होताना दिसत आहे. यावर ओक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन हा महाग परंतु प्रभावी पर्याय आहे जो घरीही वापरला जावूं शकतो. याचे भान ठेवत भारत विकास परिषेदच्या घोडबंदर शाखेतर्फे आज ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन्स ठाण्यातील रुग्ण सेवेत रुजू केली. प्रस्तुत मशिन्स कै. वामनराव ओक रक्तपेढी तून रूग्णांना अत्यल्प फी आकारून उपलब्ध केली जातील . ही मशिन्स लाईनसाइट इंडिया या कंपनी च्या CSR कार्यक्रमातून उपलब्ध केली गेली. लाईनसाइट इंडिया चे कंट्री हेड, श्री दर्शन जोशी, यांनी हि मशीन्स भारत विकास परिषेदच्या घोडबंदर शाखेचे अध्यक्ष श्री सुरीन उसगांवकर व सचीव श्री मधु नारायणनउन्नी यांना सुपूर्द केली. परिषेदच्या कार्यकारिणी चे सदस्य श्री. दत्ता घाडगे व श्री. प्रमोद नायर याप्रसंगी हजर होते .
391 total views, 1 views today