कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी नवी मुंबई महापालिका सज्ज- खासदार राजन विचारे यांनी केली पाहणी

ठाणे – खासदार राजन विचारे यांनी आज वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरला भेट देऊन  रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण, मृत्युदर, दररोज होणाऱ्या चाचण्या, ऑक्सिजन बेड्स, आयसीयु बेड्सची माहिती घेतली. त्यावेळी जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, शहरप्रमुख विजय माने महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, नोडल ऑफिसर माने, डॉ लोहार व इतर अधिकारी उपस्थित होते.

देशात व राज्यात कोरोना महामारी ने पुन्हा डोकं वर काढलेले असताना नवी मुंबईतील रुग्णांची संख्या वाढत असल्याने येथील सिडको एक्झिबिशन सेंटर मध्ये आयसीयू ऑक्सिजन व व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल माननीय आयुक्त यांचे पत्राद्वारे आभार मानले आहे. तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे वेळोवेळी लाभणाऱ्या सहकार्याबद्दल विचारे यांनी आभार व्यक्त केले. या कोरोना महामारीची तिसरी लाट येण्याची शक्यता दाट दर्शवली जात आहे यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांचा समावेश असू शकतो असा अंदाज दर्शविला जात आहे यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनीही त्याचे नियोजन करण्याचे काम सुरू केले आहे. त्याची पूर्व तयारी करणे ही तितकेच गरजेचे आहे यासाठी खासदार राजन विचारे यांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांना दि.०३/०५/२०२१ रोजी पत्राद्वारे वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर मध्ये लहान  मुलांसाठी वेगळा कक्ष बनवून त्यामध्ये ३०० ऑक्सिजन व २०० आय सी यु  बेड उपलब्ध करून ठेवण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने महापालिकेने याची तयारी सुरू केली असताना आज खासदार राजन विचारे यांनी सदर जागेची पाहणी करून त्याचा आढावा घेतला तसेच या पाहणी दौऱ्यात त्यांनी कोव्हीड वॉर्डला व मेडिकल फार्मसीला भेट देऊन उपस्थित असलेल्या नर्सेस व स्टाफ कर्मचाऱ्यांची विचारपूस करून त्यांचे मनोधैर्य वाढविले.

 297 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.