मुंब्रा दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना महापालिकेतर्फे 5 लाखांची मदत

महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते मदतीच्या धनादेशाचे वाटप

ठाणे – मुंब्रा येथील प्राईम क्रिटीकेअर रुग्णालयात 28 एप्रिल 2021 रोजी झालेल्या दुर्घटनेत चार रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ठाणे महापालिकेच्या वतीने आर्थ‍िक मदत देण्यात येईल असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिर केले होते, त्यानुसार या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना आज महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते प्रत्येकी 5 लाखांचा मदतीचा धनादेश महापौर दालनात सुपुर्द करण्यात आला.

यावेळी विरोधी पक्ष नेते अशरफ पठाण, गलिच्छ वस्ती निर्मुलन समिती सभापती साधना जोशी, उपायुक्त मनीष जोशी, सहाय्यक आयुक्त सागर साळुंखे उपस्थित होते.

कौसा येथील प्राईम क्रिटीकेअर रुग्णालयात पहाटे तीनच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेत हलिमा बी सलमानी, नवाब मजिद शेख, यास्मिन जफर सय्यद, हरी रामजी सोनावणे यांना रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. या मृतांच्या नातेवाईकांना शासनाच्या माध्यमातून मदत देण्यात येईल असे राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केले आहे. परंतु ठाणे महापालिकेच्या माध्यमातून देखील मृतांच्या नातेवाईकांना मदत केली जाईल असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिर केले होते. या मृतांच्या नातेवाईकांना महापालिकेच्या माध्यमातून तातडीने मदत मिळावी यासाठी विरोधी पक्ष नेते शानू पठाण हे देखील प्रयत्नशील होते. त्यानुसार आज मृतांचे नातेवाईक अनुक्रमे मोहम्मद रिझवान उलहकसलमानी, नझीरा नवाब शेख, बुशरा जफर सय्यद, विशाल हरी सोनावणे यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपुर्द करण्यात आला.

 502 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.