ग्रामीण भागात पहिल्याच दिवशी १८ ते ४४ वयोगटातील २१० लाभार्थ्यांचे लसीकरण

ग्रामीण भागात पहिल्याच दिवशी १८ ते ४४ वयोगटातील २१० लाभार्थ्यांचे लसीकरण

भिवंडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र दिवाअंजुर, आणि शहापूर तालुक्यातील प्रा. आ. केंद्र शेंद्रुण याठिकाणी लसीकरण

मार्गदर्शक सूचनांनुसार ऑनलाइन बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचे फक्त लसीकरण होणार , इतर नागरिकांनी लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये – जिल्हा परिषदेचे आवाहन

ठाणे – केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्य शासनामार्फत दिनांक १ मे २०२१ पासून वय वर्षे १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांसाठी कोविड – १९ लसीकरण सुरू करण्यात आलेले आहे. ग्रामीण भागातील भिवंडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र दिवाअंजुर, आणि शहापूर तालुक्यातील प्रा. आ. केंद्र शेंद्रुण, या दोन ठिकाणी आज लसीकरण करण्यात आले. यामध्ये अनुक्रमे १३९ आणि ७१ असे एकूण २१० लाभार्थ्यांनी लसीकरण केल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेघे यांनी दिली.

सद्यस्थितीतील मार्गदर्शक सूचनांनुसार आधी ऑनलाइन बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचे फक्त लसीकरण होणार आहे. त्यामुळे इतर नागरिकांनी लसीकरणासाठी लसीकरण सत्रांवर गर्दी करू नये असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, उपाध्यक्ष सुभाष पवार तसेच जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम समिती कुंदन पाटील यांनी केले आहे.

सद्यस्थितीतील मार्गदर्शक सुचनां नुसार १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण फक्त ऑनलाईन बुकिंग द्वारे होणार असल्याने इच्छुक लाभार्थींनी www.cowin.gov.in या website वर स्वतःची माहिती मोबाईल नंबर द्वारे नाव रजिस्टर करुन वेबसाईट वर सांगितले प्रमाणे ओळखपत्र इ. माहिती भरुन उपलब्ध लसीकरण सत्रांमध्ये ऑनलाईन Online appointment घ्यावी.
● Online appointment नंतर स्वतःच्या मोबाईल नं. वर appointment बद्दल खात्रीचा मेसेज येईल.
● त्यानंतर लसीकरणाच्या दिवशी appointment च्या वेळेत लसीकरण केंद्रावर appointment slip व Online booking साठी वापरलेले फोटो ओळखपत्र घेऊन आलेल्यांनाच लसीकरण करण्यात येईल अशी माहिती जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अंजली चौधरी यांनी दिली.

 311 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.