महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण


ठाण्यात तरुणांसाठी आजपासून एका केंद्रावर लसीकरण सुरु

ठाणे : महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.
ठाणे महापालिकेतर्फे १८ ते ४४ वयोगटातील तरुणांच्या कोरोना लसीकरणासाठी केंद्र सुरु करण्यात आले असून लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरण मोहिम राबवण्यात येईल, अशी माहिती शिंदे यांनी यावेळी दिली. ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना व राज्यातील नागरिकांना त्यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम पाळून साधेपणाने हा ६१ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
कोरोना बाबत सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन नागरिकांनी करण्याची  गरज आहे. लॉकडाऊन मुळे कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत आहे. मात्र परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात येईपर्यंत सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन शिंदे यांनी केले.
यावेळी महापौर नरेश म्हस्के, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाण्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, ठाणे महापालिकेचे आयुक्त विपीन शर्मा, नवी मुंबईचे आयु्क्त अभिजीत बांगर, जिल्हा शल्य चिकित्सक उपस्थित होते.

 431 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.