समुदाय संसाधन व्यक्तीशी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी साधला संवाद

कोविड १९ प्रतिबंधक लसीकरणाची करत असलेल्या जाणीवजागृती बाबत केले कौतुक

ठाणे  : ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान उंचाविण्यासाठी उमेद अभियान जिल्हात कार्यरत असून जिल्ह्यातील सत्तर टक्के महिलां या अभियानाशी जोडल्या गेल्या आहेत. या महिलांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी गावपातळीवर समुदाय संसाधन व्यक्ती कार्यरत आहेत.  सध्या कोविड प्रतिबंधक उपाययोजना बरोबरच कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण सुरु असून या महिलां  गावोगावात  नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी जाणीव जागृती करत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी या महिलांची आढावा घेऊन करत असलेल्या कामाचे कौतुक केले तसेच आगामी काळात देखील उत्तम काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आज डॉ. सातपुते यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे जिल्ह्यातील सर्व महिलांशी संवाद साधला. यावेळी प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, सहाय्यक प्रकल्प संचालक अविनाश हरणे, तसेच ग्रामीण जीवन्नोत्ती अभियानाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ. सातपुते यांनी लसीकरण करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देणाऱ्या गावपातळीवर समुदाय संसाधन व्यक्ती ( महिला वर्ग ) चे कौतुक केले. आपण गावाचे सैनिक म्हणून काम करत आहात आगामी काळात देखील महिलांमध्ये जाणीवजागृती करून लसीकरणाचे महत्व पटवून द्यावे.अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच ४५ वयोगटावरील स्वयं सहायत्ता समूहातील महिलांनी लसीकरण करण्याची सूचनाही त्यांनी केली.
अभियानात असणाऱ्या विविध दशसूत्रीतील ‘आरोग्याची जोपासना’ या सहाव्या सूत्राप्रमाणे महिलांचे आरोग्य जपण्याकरिता विविध प्रकारचे उपक्रम अभियानाच्या माध्यमातून राबविले जातात. आजच्या बैठकीत डॉ. सातपुते यांनी गावपातळीवर जनजागृती करताना येणाऱ्या अडचणी विषयी समुदाय संसाधन व्यक्ती (कम्युनिटी केडर) शी चर्चा करून त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी तसेच शंभर टक्के लसीकरण मोहीम राबविण्याकरिता त्यांना मार्गदर्शन केले.

 503 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.