ठाणे महापालिकेचा 3 लाख उच्चांकी लसीकरणाचा टप्पा पूर्ण महापौर आणि आयुक्तांच्या उपस्थितीत ३ लाख लसीकरण

ठाणे – केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शहरात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेंतर्गत ठाणे महापालिकेने आज महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत 3 लाख उच्चांकी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा महत्वपूर्ण टप्पा पूर्ण पार केला.

 कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी तयार करण्यात आलेल्या कोविशिल्ड व कोवक्सिन लसीचा डोस शासनाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार टप्या टप्प्याने देण्याचे काम महापालिका प्रशासनाच्यावतीने सुरू आहे. शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या लसीकरण साठ्यानुसार महापालिका तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये नागरिकांना पाहिला व दुसरा डोस देण्यात येत आहे.



   यामध्ये कोरोना बाधित रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना, फ्रंटलाईन वर्कर्स, ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांना पाहिला व दुसरा डोस देण्यात येत असून आज महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी महापालिकेच्या आनंद नगर येथील आपला दवाखाना येथील लसीकरण केंद्राला भेट देवून लसीकरण मोहिमेबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॅा. चारूदत्त शिंदे, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, डॉ. खुशबू टावरी आदी उपस्थित होते.



 आतापर्यंत ठाणे महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांवर 23,448 आरोग्य कर्मचाऱ्यांना पाहिला तर 14,957 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. फ्रंट लाइन कर्मचारी पैकी  22,951 लाभार्थ्यांना पहिला व 11,520 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला असून ४५ ते ६० वयोगटातंर्गत 81,956 लाभार्थ्यांना पहिला तर 10,092 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ६० वर्षावरील नागरिकांमध्ये  1,04,575 लाभार्थ्यांना पहिला डोस व 30,742 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.



   राज्य शासनाच्या मार्गदर्शन सुचेननुसार 18 वर्षाखालील व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन सज्ज असून शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या लसीनुसार लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.

 508 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.