प्रकृती चिंताजनक असल्यानेच मृत्यु, चौकशी समितीचा अहवाल सादर

ठाणे – येथील वर्तक नगर भागात असलेल्या वेंदात हॉस्पीटलमध्ये ऑक्सीजन अभावी चार जणांचा मृत्यु झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांना केला होता. त्यानंतर ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहा जणांची चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीचा अहवाल आता समोर आला असून त्या चार रुग्णांचा मृत्यु ऑक्सीजन अभावी झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्यानेच रुग्णांचा मृत्यु झाल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे.
वर्तक नगर भागातील वेदांत हॉस्पीटलमध्ये चार जणांचा मृत्यु झाल्याची घटना सोमवारी घडली. परंतु या चौघांचे मृत्यु ऑक्सीजन अभावीच झाला असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला. त्यामुळे रुग्णालय प्रशासन चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते. या ठिकाणी ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पाहणी करुन या प्रकरणाच सहा जणांची चौकशी समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असेही स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार या समितीने सोमवारी सांयकाळी उशिरा रुग्णालयात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यानुसार या चारही रुग्णांचा मृत्यु ऑक्सीजन अभावी झाला नसल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे. तसेच या रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्यानेच त्यांचा मृत्यु झाला असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. तसेच, प्रत्येक रुग्णाचा मृत्युची वेळ ही वेगवेगळी असल्याचेही पाहणीत समोर आले आहे. त्यातही येथे उपचारार्थ अन्य रुग्ण असून ऑक्सीजन नसते तर त्यांना देखील याचा फटका बसला पाहिजे होता, परंतु तसे काहीच निदर्शनास आलेले नाही. त्यामुळेच त्या चार रुग्णांचा मृत्यु हा ऑक्सीजन अभावई झाला नसल्याचे या समितीने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.

 375 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.