नेरुळ येथील शुश्रूषा हार्ट केयर हॉस्पिटलमध्ये कोव्हीड लसीकरणाला जेष्ठ नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद 

लस घेतल्यानंतरही नागरिकांनी जबाबदारीने मास्क, सोशल डिस्टंसिंग आणि सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीचा अवलंब करावा व आपल्या समाजाची सुरक्षा करून कोरोना आजाराचे समूळ उच्चाटन करण्यास मदत करावी , असे आवाहन शुश्रूषा हार्ट केयर व स्पेशालिटी  हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.

नवी मुंबई : कोरोना विषाणू या आजाराला प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून  लसीकरणाला  सुरुवात झाली असून नेरुळ येथील शुश्रूषा हार्ट केयर व स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये या लसीकरणाला जेष्ठ नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभत आहे.वृद्धत्वामुळे तसेच काही आजारांमुळे अंथरुणाला खिळून बसलेले अनेक जेष्ठ नागरिक स्वतःहून लसीकरणासाठी पुढे येत आहेत कोव्हीड लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात  आता ४५ ते ५९ वर्षापर्यंत व ६० वर्षावरील नागरिकांना ही लस उपलब्ध झाली आहे. नवी मुंबईतील  महापालिका रुग्णालय, आणि खाजगी रुग्णालयात ही लस उपलब्ध झालेली आहे. ही लस अतिशय परिणामकारक असून यामुळे कोरोनापासून बचावासाठी ९० टक्के सुरक्षा मिळते, त्यामुळे प्रत्येक नागरिकाने कर्तव्याने ही लस टोचून घ्यावी असे आवाहन शासनातर्फे करण्यात आले असून  संपूर्ण लसीकरणात लसीचे दोन डोस घ्यावे लागतात एक डोस घेतल्यानंतर २८ दिवसानंतर दुसरा डोस घ्यावा लागतो त्यामुळे कोरोना आजारापासून सुरक्षा मिळण्यास मदत होते. लस घेतल्यानंतरही नागरिकांनी जबाबदारीने मास्क, सोशल डिस्टंसिंग आणि सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीचा अवलंब करावा व आपल्या समाजाची सुरक्षा करून कोरोना आजाराचे समूळ उच्चाटन करण्यास मदत करावी , असे आवाहन शुश्रूषा हार्ट केयर व स्पेशालिटी  हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे. जगभरात अनेक देशांत कोरोनाच्या लसीकरण मोहीम सुरू झाल्यात, पण, त्याविषयीही लोकांच्या शंका आहेत. कारण, दहा महिन्यात लस तयार झालीय. मग काही गडबड नाही ना, घाई-गडबडीत लशींना परवानगी मिळाली नाही ना, अशा शंका आहेत;म्हणूनच लसीकरणाबरोबरच लोकांचं समुपदेशन आमच्या येथील नर्सेस करीत असल्याची माहिती शुश्रूषा हार्ट केयरचे संचालक डॉ. संजय तारळेकर यांनी दिली.

 648 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.