कोव्हीशिल्डचा पुरवठा थांबला…ठाण्यात कोविड लसीकरणाला ब्रेक ?

आमदार संजय केळकर यांची ठाणे महापालिका आयुक्तांशी चर्चा

 ठाणे : देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली असून महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीत ठाणे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. तेव्हा, कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढत असतानाच कोविड लसीकरणाला ब्रेक लागण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण, सिरम इन्स्टीट्युटच्या कोव्हीशिल्ड लसीचा पुरवठा बंद झाल्याने ही आफत ओढवल्याचे समजते. कोव्हीशिल्डऐवजी कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा होणार असला तरी, यापूर्वी कोव्हीशिल्ड लस घेतलेल्या नागरिकांची गैरसोय होण्याची भिती ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली असुन यासंदर्भात, ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची भेट घेऊन चर्चा केली. त्याचप्रमाणे, शासनाकडेही याबाबत मागणी केली असुन ठाण्यासाठी लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करावा.अशी माहिती आमदार केळकर यांनी दिली.
केंद्र शासनाने निर्देशित केलेल्या शहरातील ६० वर्षे पूर्ण केलेले वयोवृद्ध नागरिक, फ्रंटलाईन वर्कर्स,४५ वर्षावरील विविध व्याधीग्रस्त लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी ठाणे महापालिकेने व्यापक मोहीम हाती घेतली आहे.यासाठी शहरात खाजगी ११ व ४२ शासकिय अशा ५३ ठिकाणी लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्यानुसार, लसीकरण सुरु असुन सिरमच्या कोव्हीशिल्ड लसीदवारे दररोज सुमारे ७ हजार ५०० नागरीकांचे लसीकरण होते. आजपावेतो ८२ हजार नागरिकांचे पहिल्या टप्यातील लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, सद्यस्थितीत कोव्हीशिल्ड लसीचा साठा संप त आला असुन जेमतेम दोन दिवस पुरेल इतकाच कोव्हीशिल्डचा साठा उपलब्ध असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने कोविड लसीकरणाला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, गेले काही दिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन ठाणे शहरात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्याचे भाजप आमदार संजय केळकर यांनी सोमवारी ठामपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेऊन लसीकरणाबाबत चर्चा केली. तसेच, लस पुरवठ्याबाबत आढावा घेत शासन दरबारीही पाठपुरावा करणार असल्याची माहिती दिली. तर, यावेळी आयुक्तांनी १० हजार कोव्हॅक्सिन लसींचा पुरवठा होणार असल्याचे स्पष्ट करीत त्याबाबतच्या प्रशिक्षणाला दुजोरा दिला. तरीही, यापुर्वी तब्बल ८२ हजाराहुन अधिक नागरिकांना पहिला डोस कोव्हीशिल्ड लसीचा देण्यात आला असताना त्यांना दुसरा डोस अन्य लशीचा चालणार नाही.तेव्हा, कोव्हीशिल्ड लस घेतलेले नागरिक मात्र धास्तावले आहेत.
ठाण्यात लसीकरण केंद्र वाढवा – आमदार केळकर
 ठाणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहावे. अशा सुचना आमदार संजय केळकर यांनी ठामपा प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. त्याचबरोबर सध्या असलेल्या ११ खाजगी व ४२ शासकिय अशा एकुण ५३ केंद्रातुन लसीकरण सुरु आहे.तरीही, ठाण्यात आणखी केंद्र वाढवण्याची आवश्यक्ता असुन तीन पेट्रोलपंप जवळील रेडक्रॉस भवन येथेही लसीकरण केंद्र सुरु केल्यास नागरिकांची फरफट थांबवता येईल. अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांकडे केली असुन शासनानेही या मागणीला त्वरीत मंजुरी द्यावी.

 591 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.