मळेगाव जिल्हा परिषद गटात राजेश विशे यांचा पाणी टंचाई पाहणी दौरा

शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वसाधारणपणे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस पाणीटंचाईची दाहकता जाणवते.शहापुरच्या पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी शासन दरवर्षी लाखो रुपये खर्च करत असते,परंतू दुर्गम भागातील पाणीटंचाईचे चिञ बदलण्यात अपयश आले आहे.

शहापूर : शहापूर तालुक्यातील मळेगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य राजेंद्र विशे यांनी अधिकारी व पदाधिकारी यांच्यासह नुकताच पाणी टंचाई पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.
शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वसाधारणपणे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस पाणीटंचाईची दाहकता जाणवते.शहापुरच्या पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी शासन दरवर्षी लाखो रुपये खर्च करत असते,परंतू दुर्गम भागातील पाणीटंचाईचे चिञ बदलण्यात अपयश आले आहे.
मळेगाव जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे कर्तृत्ववान सदस्य राजेंद्र विशे मात्र प्रशासनाच्या तयारीची वाट न पाहता आपल्या मतदार संघातील पाणी टंचाई आढावा घेण्यासाठी अधिकारी व पदाधिकारी यांच्या समवेत दौरा केला व परिस्थितीचा आढावा घेतला.
मळेगाव जिल्हा परिषद गटातील शिल्लोत्तर, साठगाव, शेणवे, कुलवंतनगर,मळेगाव, नारायणगाव, मुगाव, अस्नोली, नांदवळ, अल्याणी आदी ठिकाणी महिलांना भेडसावणाऱ्या पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा,अपूर्णावस्थेत असलेल्या योजना पूर्ण करवाव्यात व काही ठिकाणी जादा निधीची गरज भासल्यास प्रस्ताव तयार करून ते कार्यवाहीसाठी वरीष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याच्या सूचना विशे यांनी ग्रामसेवक,ग्रामपंचायत सदस्य व पाणीपुरवठा अधिकारी यांना केल्या.या वेळी शेणवे विभागप्रमुख दीपक लकडे, काशिनाथ पडवळ, विनायक सापळे, नरेश विशे,ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील शाखा उपअभियंता एम.जी.आव्हाड, शाखा अभियंता अशोक अर्जुन जाधव, कनिष्ठ अभियंता प्रमिला पांडुरंग विशे,मदतनीस रवी विशे आदी उपस्थित होते.
ठाणे जिल्हा परिषदेच्या सभागृहातील सर्वात संवेदनशील व प्रशासकीय कामकाजात तरबेज असलेले सदस्य म्हणून राजेंद्र विशे यांची ओळख आहे.आपल्या मतदारसंघातील अनेक प्रलंबित विकास कामांसाठी ते प्रशासकीय स्तरावर संघर्ष करून निधी मंजूर करून आणत आहेत

 486 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.