जिल्हा परिषद अध्यक्षा सुषमा लोणे यांच्या हस्ते नळपाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन
पेंढरघोळ पासून भातसा धरण ५ किलोमीटरवर आहे तरीही येथील आदिवासी महिलांना पाडयात पाण्याचे कोणतेही स्रोत नसल्याने, पाण्यासाठी ३, ४ किलोमीटर पर्यंत करावी लागत होती वणवण भटकुन पायपीट
शहापूर ( शामकांत पतंगराव ) : भातसा धरणालगत असणाऱ्या शहापुर तालुक्यातील पेंढरघोळ या १०० टक्के आदिवासी वस्तीत जिप च्या १५ व्या वित्त आयोगाच्या पाणी टंचाई निधितुन नळ पाणीपुरवठा योजना अंतर्गत जलकुंभद्वारे पाणीपुरवठा योजना राबवून घरोघरी नळजोडणी देऊन येथील पाणी टंचाई कायमची दूर केल्याने येथील नागरिकांनी फटाके फोडून दिवाळी साजरी केली.या योजनेचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्षा सुषमा लोणे, माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या हस्ते करण्यात आले.
पेंढरघोळ पासून भातसा धरण ५ किलोमीटरवर आहे तरीही येथील आदिवासी महिलांना पाडयात पाण्याचे कोणतेही स्रोत नसल्याने, पाण्यासाठी ३/४ किमी पर्यंत वणवण भटकुन पायपीट करावी लागत होती.या ग़ैरसोईची दखल घेत कृषी व पशुसवर्धन सभापती संजय निमसे,माजी आमदार पांडुरंग बरोरा व माजी सरपंच भास्कर बरोरा यांनी वनविभागाकड़े जलकुंभासाठी जमीन मिळविण्यासाठी व जलकुंभ नळ पाणीपुरवठा योजनेसाठी ठाणे जिपकड़े पाठपुरावा करून २०१९/२० मध्ये पाणी टंचाई कार्यक्रम अंतर्गत पेंढरघोळसाठी१९ लाख रूपयांची जलकुंभ नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली.
.यावेळी पेंढरघोळ येथे कायमस्वरूपी पाणी साठा करून वितरित करण्यासाठी कॉन्क्रीट टाकिसाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी केली.यावेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हिरसिंग भस्मे,उपअभियंता माणिक आव्हाड,शहापुर पंस सभापती रेश्मा मेमाणे,उपसभापती जगन पष्टे,सरपंच पद्मावती बरोरा,जिप सदस्य संगीता गांगड आदि मान्यवर उपस्थित होते.
642 total views, 1 views today