सत्कारमूर्तीमध्ये मुंबईस्थित लिज्जत पापडच्या जसवंती जमनादास यांचा समावेश होता
मुंबई : कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या महाराष्ट्र विभागातर्फे ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त देशातील सर्व राज्यातील जागतिक स्तरावरील सर्वात प्रतिष्ठीत अशा ३७ महिला उद्योजिकांचा देशाची राजधानी दिल्लीत गौरव करण्यात आला. या सत्कारमूर्तीमध्ये मुंबईस्थित लिज्जत पापडच्या जसवंती जमनादास यांचा समावेश होता. या कार्यक्रमाला केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री सोम प्रकाश आणि प्रख्यात वास्तुतज्ञ डॉ. खुशदिप बंसल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते अशी माहिती कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी वेलफेयर महासंघाचे अध्यक्ष सुरेशभाई ठक्कर यांनी दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॅटचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रविण खंडेलवाल आणि कॅटच्या दिल्ली विभागीय समितीने मोलाचे योगदान दिले.
506 total views, 3 views today