साई भक्त महिला फांऊडेशनच्यावतीने सानपाडा रेल्वे स्टेशननजीक उभारण्यात आले ‘पुर्णब्रम्ह पोळी भाजी केंद्र’
नवी मुंबई : प्रभाग ७६ मधील भाजपाचे कार्यकर्ते व समाजसेवक पांडुरंग आमले यांचा वाढदिवस सोमवारी (दि. १ मार्च) उत्साहात साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त साई भक्त महिला फांऊडेशनच्यावतीने सानपाडा रेल्वे स्टेशननजीक ‘पुर्णब्रम्ह पोळी भाजी केंद्रा’चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी समाजसेवक पांडुरंग आमले यांच्यासमवेत भाजपाचे विजय घाटे, आबा जगताप, श्रीमंत जगताप, निलेश वर्पे, आज्ञा गवाणे, निता आंग्रे, संचिता जोइल, प्रतिभा पवार, मंगल वाव्हळ, सुलोचना निंबाळकर, विमल पाटील, दिशा केणी, शारदा आमले, मनिषा पाटील यांच्यासह निसर्गप्रेमी फांऊडेशनचे सदस्य, भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
467 total views, 1 views today