इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसची निदर्शने

दरवाढ मागे न घेतल्यास केंद्र सरकारलाच आम्ही चूलवर बसवू. या दरवाढीच्या निषेधातील हे आंदोलन या पुढे दिल्लीत जाऊन करु आणि केंद्र सरकारला धडा शिकवू, असा दिला इशारा

ठाणे : गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड ,महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि महिला अध्यक्ष सौ सुजाता विजय घाग यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्षा सुरेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने केलेल्या गॅस पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ पेट्रोल पंपासमोरच जोरदार निदर्शने करण्यात आली.
गेल्या काही दिवसात केंद्र सरकारच्या वतीने इंधनाच्या तसेच घरगुती सिलिंडरच्या दरात प्रचंड दरवाढ करण्यात येत आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ पाचपाखाडी येथील शेल पेट्रोल पंपाच्या बाहेर ही निदर्शने करण्यात आली. यावेळी सुरेखा पाटील यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. गेल्या दोन महिन्यात सिलिंडरच्या दरात साधारणपणे शंभर रुपयांची दरवाढ झाली आहे. त्यामुळे आता महिलांवर चूल पेटवण्याची वेळ आली आहे. पण, ही दरवाढ मागे न घेतल्यास केंद्र सरकारलाच आम्ही चूलवर बसवू. या दरवाढीच्या निषेधातील हे आंदोलन या पुढे दिल्लीत जाऊन करु आणि केंद्र सरकारला धडा शिकवू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
या आंदोलनामध्ये कोपरी-पाचपाखाडी विधानसभा अध्यक्षा फुलबानो पटेल , कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्षासाबिया मेमन , प्रदेश प्रतिनिधी ज्योती निम्बर्गी , शशीकला पुजारी , कल्पना नार्वेकर , भानुमती पाटील , पल्लवी गीध , मनीषा भाबड , माया केसरकर , संगीता लोकरे , घोलप ताई , सुवर्णा खिलारे , सुरेखा शिंदे , संगीता चंद्रवंशी , स्नेहल चव्हाण आदी महिला उपस्थित होत्या

 545 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.