ठाणेकरांच्या भेटीला ऐतिहासिक नाणी व शस्त्रांचा नजराणा

ठाणे पूर्वेत शिवजयंतीच्या निमित्ताने अनोखा प्रदर्शन, गौतम मित्र मंडळ व पद्म फाउंडेशनचा उपक्रम

ठाणे : शिवकालीन शस्त्रास्त्रे, ऐतिहासिक नाणी आदींचे भव्य प्रदर्शन ठाणे पूर्वेत गौतम मित्र मंडळ व पद्म फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार, १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने शिवकालीन इतिहास आणि त्यातील विविध वस्तूंचा जाज्वल्य इतिहास पुन्हा एकदा जिवंत केला जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी ठाणे पूर्वेच्या कोपरी कॉलनी येथील धोबीघाट परिसरात विजयी क्रांती चौकासमोर गौतम मित्र मंडळ व पद्म फाउंडेशनच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे यंदा १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून सकाळी १० ते रात्रौ १० या वेळेत धोबीघाट येथील विजयी क्रांती चौकासमोर शिवकालीन शस्त्रास्त्रे, ऐतिहासिक नाण्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. भाजप आमदार संजय केळकर, भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उदघाटन केले जाणार आहे, अशी माहिती गौतम मित्र मंडळ व पद्म फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश गाडे यांनी दिली. या प्रदर्शनातून सर्वसामान्यांना शिवकालीन इतिहास हा त्याकाळात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या माध्यमातून जिवंत करून सांगितला जाणार आहे, असेही गाडे यांनी सांगितले.

 462 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.