या यंत्राचा वापर करुन धोकादायक, अतिधोकादायक सुमारे ७ ते ८ मजली इमारतींचे बांधकाम निष्कासित करणे सुलभ होणार आहे आणि या यंत्राने इमारतींचे निष्कासन केल्यामुळे वेळेची बचतही होणार आहे.
कल्याण : हाय रिप जॉ क्रशर मशिनद्वारे अतिधोकादायक मुस्तफा मंजीलचे निष्कासनाचे काम आज सुरु करण्यात आल्याने या कामाला गती मिळाली आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात बहुमजली इमारतींची अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यासाठी यापूर्वी जेसीबी, पोकलेन या यंत्रसामुग्रीचा वापर करण्यात येत होता, परंतू निष्कासनाचे काम अधिक सक्षमपणे करण्याकरीता महापालिकेने मंजूर निविदा धारकामार्फत हाय रिप जॉ क्रशर मशिन आज मागविली. या यंत्राचा वापर करुन धोकादायक, अतिधोकादायक सुमारे ७ ते ८ मजली इमारतींचे बांधकाम निष्कासित करणे सुलभ होणार आहे आणि या यंत्राने इमारतींचे निष्कासन केल्यामुळे वेळेची बचतही होणार आहे.
ऐतिहासिक कल्याण शहरातील महापालिका कार्यालयासमोरील मुख्यद्वार, शंकरराव चौक येथील मुस्तफा मंजील या अतिधोकादायक इमारतीच्या निष्कासनाचे ऊर्वरित काम आज या यंत्राचा वापर करुन सुरु करण्यात आले. हि मशिन ही महाराष्ट्रातील मोजक्याच शहरांमध्ये आहे. या यंत्राच्या वापराचा पहिलाच दिवस असल्याने नविन यंत्राचा वापर सुरु करतांना अतिरिक्त आयुक्त तथा सह नियंत्रक (अबांनि) सुनिल पवार, मुख्यलेखा परिक्षक लक्ष्मण पाटील, उपआयुक्त पल्लवी भागवत, उप आयुक्त उमाकांत गायकवाड, विभागिय उपआयुक्त विनय कुलकर्णी, महापालिका सचिव संजय जाधव, सहा आयुक्त (साप्र) अरुण वानखेडे, सहा. आयुक्त सुहास गुप्ते, क प्रभागक्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे आणि ठेकेदार शंकर चव्हाण या प्रसंगी उपस्थित होते.
538 total views, 1 views today