तुशी शाह आणि सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा मानकरी ठरलेली दर्शना पवारने संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली.
ठाणे : निगेव्ह क्रिकेट अकॅडमीने दहिसर स्पोर्ट्स क्लबचा ४१ धावांनी पराभव करत डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित अर्जुन मढवी स्मृती महिला टी २० क्रिकेट लीग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत खेळण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. सेंट्रल मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात तुशी शाह आणि सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा मानकरी ठरलेली दर्शना पवारने संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. प्रथम फलंदाजी करताना तुशी शाह(३१), सेजल राऊत (२७) आणि सलोनी कुष्टेच्या २६ धावांच्या जोरावर निगेव्ह क्रिकेट अकॅडमीने ७ बाद १४४ धावा अशी मजल मारली. प्रियंका गोळीपकरने २४ धावात २ विकेट्स मिळवल्या. बतुल परेरा, वैष्णवी देसाई आणि सुप्रिया पवारने प्रत्येकी एक विकेट मिळवली. या आव्हानाचा पाठलाग करताना दहिसर स्पोर्ट्स क्लबला निर्धारित २० षटकात ८विकेट्स गमावून १०३ धावापर्यंत मजल मारता आली. स्नेहा रावराणेने ४१ आणि राधिका ठक्करने २० धावा करत किल्ला लढवला. प्रतिस्पर्धी फलंदाजांना मर्यादित धावसांख्येवर रोखताना दर्शना पवारने १५ धावा देत ३ विकेट्स मिळवल्या. सायमा ठाकोर आणि प्रकाशिका नाईकने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.
487 total views, 1 views today