काळा बाजार करणाऱ्या रेशनिंग दुकानांची भाजप महिला मोर्चाने केली पोलखोल

शहरातील सर्व रेशनिंग दुकानांची घेणार झाडाझडती – मृणाल पेंडसे

ठाणे : रेशनिंग दुकानांतून सर्वसामान्यांना योग्य धान्य मिळणे गरजेचे होते. परंतु गुरुवारी भाजपच्या महिला मोर्चाने ज्ञानेश्वर नगर भागातील गंगाधर नगर येथे टाकलेल्या रेशनिंग दुकानाच्या धाडीत सर्वसामान्यांना मिळणारे धान्य जास्तीचे आले असतांना नागरीकांना मात्र कमी धान्य दिले जात असल्याची गंभीर बाब उघडकीसआली. त्यामुळे आता असेच प्रकार शहरातील इतर रेशनिंग दुकानातून सुरु असण्याची दाट शक्यता असल्याने या दुकानाप्रमाणोच शहरातील इतर रेशनिंग दुकानांचीही पोलखोल केली जाईल असा इशारा यावेळी भाजपच्या ठाणे शहर महिला अध्यक्षा मृणाल पेंडसे यांनी दिला.
ठाण्यातील काही भागातील रेशनिंग दुकानांच्या विरोधात मागील काही दिवसापासून भाजप महिला मोर्चाकडे तक्रारी येत होत्या. त्या अनुषंगाने गुरुवार पासून महिला मोर्चाच्या वतीने शहरातील सर्वच रेशनिंग दुकानांची पाहणी करुन झाडाझडती करण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार गुरुवारी पहिल्याच दिवशी ज्ञानेश्वर नगर भागातील गंगाधर नगर भागातील रेशनिंग दुकानाची पाहणी केली असता सदर दुकानदार हा जास्तीचे धान्य मिळत असतांनाही सर्वसामान्यांना मात्र कमी धान्य दिले जात असल्याची पोलखोल यावेळी महिला मोर्चाने केली. त्यानुसार या दुकानादाराने ही चोरी केली असल्याचे मान्य केले. त्यानंतर ज्यांचे धान्य कमी देण्यात आले होते. त्यांना बोलावून ते धान्य त्यांना दिले गेले. यावेळी महिला मोर्चाने या रेशनिग दुकानदाराची चांगलीच कान उघाडणी केली. तसेच, शासनाने जी लिंक दिलेली आहे, त्यानुसार प्रत्येकाला ते मिळते आहे का? त्या लिंक विषयी देखील सर्वसामान्यांना माहिती नाही, त्यामुळे त्यांच्यातही जनजागृती करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. या पाहणी दौ:याच्या माध्यमातून केवळ महिलांना हक्काचे धान्य मिळते का नाही हाच या मागचा प्रमुख उद्देश असल्याचे महिला मोर्चाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
कोरोना काळात शुभम अग्रवाल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अनेक सर्वसामान्यांना त्यांचे हक्काचे रेशन मिळते का नाही, यासाठी खुप काम केले आहे. त्यामुळे त्यांना रेशनिंग दुकानांविषयी किंवा प्रत्येकाला किती धान्य मिळायला हवे याची माहिती आहे. त्यानुसार ते देखील या पाहणी दौऱ्यात यावेळी उपस्थित होते.
आमच्याकडे रेशनिंग दुकानांच्या बाबत तक्रारी आल्या होत्या. त्याची शहनिशा करण्यासाठी रेशनिंग दुकानांची झाडाझडती करण्यात येत आहे. प्रत्येक नागरीकाला आपल्या हक्काचे धान्य मिळाले हाच आमचा प्रमुख उद्देश या मागचा आहे. त्यानुसार हा पाहणी दौरा करण्यात आला. परंतु पहिल्याच झाडाझडतीमध्ये रेशनिंग दुकानदाराने धान्यचा काळाबाजर केला असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता शहरातील सर्व रेशनिंग दुकानांची पाहणी करुन पोलखोल केली जाईल असा इशारा भाजपच्या ठाणे शहर महिला अध्यक्षा मृणाल पेंडसे यांनी दिला आहे.

 514 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.