ग्राहकांना ऑटोमोटिव आणि औद्योगिक उत्पादने व सोल्युशन्स जगातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या ई-कॉमर्स बाजारपेठेपैकी एका बाजारपेठेद्वारे सहज उपलब्ध करून घेता येतील
मुंबई : एसकेएफ इंडियाने आज त्यांचे ई-शॉप eshop.skf.co.in सुरू केले. हे रिटेल व औद्योगिक ग्राहकांना ऑटोमोटिव्ह व व इंडस्ट्रियल बिझनेस उत्पादने देऊ करणारे एक ऑनलाइन स्टोअर आहे. बाजारपेठेच्या सर्व वर्गांतील ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या आणि अद्वितीय असा ग्राहक अनुभव सातत्याने देत राहण्याच्या एसकेएफच्या वायद्याचा हे ऑनलाइन स्टोअर हा एक भाग आहे. यातून देशाच्या ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमालाही चालना मिळणार आहे.
या २४/७ स्वयंसेवा ऑनलाइन स्टोअरचा उद्देश ग्राहकांना एसकेएफची अस्सल व खात्रीशीर उत्पादने थेट उपलब्ध करून देणे हा आहे. या उत्पादनांमध्ये इंडस्ट्रिअल व ऑटोमोटिव्ह वर्गातील बेअरिंग्ज आणि बेअरिंग युनिट्स, हाउसिंग आणि अॅक्सेसरीज, ग्रीजेस व अन्य देखभालीची उत्पादने आदींचा समावेश होतो. सर्व प्रक्रिया उद्योग, एमएसएमई, व्यापारी, रिटेल विक्रेते, वाहनांसंदर्भातील बाजारउत्तर रिटेलर्स, मेकॅनिक्स व वाहनताफ्यांचे मालक सर्वांना या उत्पादन व सोल्युशन्सच्या विस्तृत श्रेणीचा लाभ होणार आहे.
“आम्हाला आमच्या ग्राहकांच्या पसंतीचे सहयोगी व्हायची इच्छा आहे आणि आमचे ग्राहक व सहयोगी यांच्या डिजिटल रूपांतरण प्रवासाला उपयुक्त अशी व्यासपीठे तयार करण्यासाठी आम्ही बांधील आहोत,” असे एसकेएफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष भटनागर सांगतात. “ग्राहकांच्या बदलत्या खरेदी प्राधान्यक्रमांशी जुळवून घेण्याची क्षमता ई-शॉप आम्हाला देते तसेच सध्या अस्तित्त्वात असलेल्या विभागांमधील स्थान भक्कम करण्यासोबतच नवीन बाजारपेठांमध्ये कार्यक्षेत्र विस्तारण्याच्या आमच्या धोरणाला ई-शॉपची मदत होणार आहे. उत्पादन व सोल्युशन्सची विस्तृत श्रेणी असलेले हे व्यासपीठ आमच्या सध्याच्या तसेच नवीन ग्राहकांना खात्रीशीर व अखंडित ऑनलाइन अनुभव पुरवेल.”
नवीन ऑनलाइन स्टोअरची वैशिष्ट्य
● या साइटवर वाहन तसेच औद्योगिक क्षेत्रांमधील उत्पादनांची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे.
● प्रोडक्ट सर्च बारमुळे वापरकर्ते त्यांना हवे असलेले उत्पादन भाग क्रमांक, उत्पादन वर्ग आदी देऊन झटपट व अचूक शोधू शकतात.
● प्रत्येक उत्पादनाचे तपशील देणाऱ्या पेजवर सर्व माहिती असल्याने ऑर्डर प्लेस करणे सोपे होते.
● ग्राहक अतिरिक्त आकर्षक योजना व सर्वोत्तम दरांचाही लाभ घेऊ शकतात.
● ग्राहकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी एक व्यक्तिगत विक्री सहाय्यक तत्काळ (रिअल टाइम) दिला जातो.
● ई-शॉपवरील पेमेंटच्या पद्धती सुरक्षित आहेत आणि सुलभ व्यवहारांसाठी स्वयंसेवा खाते व्यवस्थापनाची सोय आहे.
ई-शॉपच्या माध्यमातून, एसकेएफ कधीही ग्राहकांच्या बदलत्या प्राधान्यक्रमांबद्दल अधिक माहिती घेऊ शकेल. त्यामुळे ग्राहकांना अधिकाधिक समाधान देण्याच्या एसकेएफच्या वचनाच्या पूर्तीमध्ये मदत होईल.
421 total views, 2 views today