रुग्णांची परिस्थिती काय आहे. वसाहतीची स्थिती काय आहे. कुष्ठरोग रुग्णालय एप्रिल अखेर्पयत तयार होणार असून औषध किती आहेत याची स्थिती आयुक्तांनी जाणून घेतली.
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत १६ नवीन कुष्ठरोग रुग्ण त्यातील चार हे विकृत आहेत. ही गंभीर बाब असून याची दखल केडीएमसीने घेतली आहे. तर कुष्ठरुग्णांच्या रोजगारासाठी प्रयत्न करणार असल्याचे केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कुष्ठरोग वसाहतीच्या दौरात सांगितले. यावेळी त्यांनी वसाहतीची परिस्थिती आणि आरोग्य यंत्रणोच्या कामाची पाहणी केली.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कचोरे नजीक हनुमाननगर कुष्ठरोग वसाहत आहे. आज कुष्ठरोग दिननिमित्त केडीएमसी आयुक्त सूर्यवंशी, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. अश्वीनी पाटील, माजी नगरसेवक कैलास शिंदे, माजी नगरसेविका रेखा चौधरी, कुष्ठरूग्णांसाठी काम करणारे गजानन माने, प्रदीप गायकवाड आदींच्या उपस्थितीत या वसाहतीची पाहणी करण्यात आली. केडीएमसीत १६ नवे कुष्ठरुग्ण आढळून आहेत. त्यातील चार हे विकृत आहे. ही गंभीरबाब असल्याने हा पाहणी दौरा महत्वाचा होता.
रुग्णांची परिस्थिती काय आहे. वसाहतीची स्थिती काय आहे. कुष्ठरोग रुग्णालय एप्रिल अखेर्पयत तयार होणार असून औषध किती आहेत याची स्थिती आयुक्तांनी जाणून घेतली. महिलांना रोजगारसाठी शिवणयंत्रे दिली जाणार असून कुष्ठरूग्णांसाठी रोजगार उपलब्ध देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.
495 total views, 1 views today