अस्नोलीच्या कबड्डी स्पर्धेत दहागाव संघाने मारली बाजी

अणखरगाव संघ ठरला उपविजेता

शहापूर (शामकांत पतंगराव) : अस्नोली येथे ओमकार मित्र मंडळाने आयोजीत केलेल्या प्रकाश झोतातील दोन दिवसीय कबड्डी स्पर्धेत दहागावच्या जय बजरंग संघाने बाजी मारली असून अणखरगावचा गावदेवी क्रिडा मंडळाचा संघ उपविजेता ठरला तर धसईच्या श्री समर्थ संघाला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.
शहापूर तालुक्यातील अस्नोली येथील ओमकार मित्र मंडळाने प्रकाश झोतातील दोन दिवसीय कबड्डी स्पर्धा संपन्न झाली.माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश दिनकर यांच्या नेतृत्वाखाली मंडळाचे अध्यक्ष संदेश विलास दिनकर ,उपाध्यक्ष प्रतीक दिनकर व मार्गदर्शक सचिन दिनकर व शिवाजी दिनकर यांच्या संकल्पनेतून २३ आणि २४ जानेवारी दरम्यान हि स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.
शहरी व ग्रामीण अशा ३२ पुरुष संघांनी स्पर्धेत भाग घेतला होता.जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक,शैक्षणिक,साहित्य क्षेत्रातील अनके मान्यवरांनी या ठिकाणी भेटी दिल्या व उत्तम नियोजन केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले.सर्व मान्यवरांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत चाललेल्या कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला.यात दहागावच्या जय बजरंग संघाने बाजी मारली व अणखरगावचा गावदेवी क्रिडा मंडळाचा संघ उपविजेता ठरला तर धसईच्या श्री समर्थ संघाला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.उत्कृष्ट चढाई म्हणून या गावचा भूमिपुत्र प्रणव कणकोसे तर उत्कृष्ट पकड म्हणून सर्वेश शेडगे यास मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सामन्यांचे समालोचन रमेश शिंदे,रिकी खाडे व हेमंत सोनावळे यांनी केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अस्नोली व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.

 530 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.