शाळा २७ जानेवारी पासुन सुरु होणार
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या तसेच आश्रमशाळा शाळा २७ जानेवारी पासुन सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.
ठाणे जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळा विद्यार्थ्यांसाठी १६ जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.परंतु आता ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व व्यवस्थापनाच्या ५वी ते १२ वी पर्यतच्या शाळांसह आश्रमशाळा सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. शहरी भागांतील सर्व शाळांबाबत स्वतंत्रपणे राज्य शासनाच्या निर्देशांप्रमाणे निर्णय घेण्यात येतील. तसेच अंबरनाथ व कुळगाव बदलापुर नगरपालिका क्षेत्रातील शाळांबाबत वेगळे निर्देश देण्यात येतील.
शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशांचे पालन करणे संबंधित शाळा प्रशासनावर बंधनकारक असेल असेही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.
450 total views, 3 views today