निफ्टीमध्ये गुंतवणूक करताना या गोष्टी ठेवा लक्षात

आपल्याला काय हवे आहे याने सुरुवात करा आणि सर्वात महत्त्वाच्या आर्थिक ध्येयांची यादी करा. तुम्ही लग्नासाठी, मुलांच्या कॉलेज फंडसाठी, निवृत्ती किंवा इतर कारणांसाठी गुंतवणूक करताय हे आधी निश्चित करा.

मुंबई : म्युच्युअल फंडानंतर स्टॉकमार्केटचे शिक्षण घेऊ इच्छिणा-यांनी आधीच्या गुंतवणुकीपेक्षा मार्केटमधील गुंतवणूक वेगळी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. उदा. निफ्टी एक इंडेक्स असून यात नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील टॉप ५० सूचीबद्ध कंपन्यांचा समावेश असतो. तर दुसरीकडे सेन्सेक्स हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा ३० स्टॉकचा बॅरोमीटर आहे. विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणा-या कंपन्यांचे हे ब्लू-चिप स्टॉक्स असतात. यात गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याबद्दल सांगताहेत फिनॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांजल कामरा.
गुंतवणूक उद्दिष्ट तयार करा: आपलं आर्थिक आरोग्य कसं साधायचं हे जाणून घेणं ही स्वत:सााठी करण्याची महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. हे करण्यासाठी तुम्ही तज्ञ असण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त काही मूलभूत गोष्टी जाणून घेण्याची गरज असावी, योजना आखली पाहिजे आणि तिच्यानुसार वागण्यासाठी शिस्त राखली पाहिजे.
आपल्याला काय हवे आहे याने सुरुवात करा आणि सर्वात महत्त्वाच्या आर्थिक ध्येयांची यादी करा. तुम्ही लग्नासाठी, मुलांच्या कॉलेज फंडसाठी, निवृत्ती किंवा इतर कारणांसाठी गुंतवणूक करताय हे आधी निश्चित करा. त्यानंतर प्रत्येक विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किती वर्ष लागतील, हे ठरवावे लागेल. कारण तुुम्ही गुंतवणूक सुरु केल्यावर एंट्री आणि एक्झिट करताना, या गोष्टींवर खूप परिणाम होता. पण नियोजन केल्यास गोष्टी सोप्या होतात.
डिमॅट व ट्रेडिंग खाते उघडा: गुंतवणूक सुरू करण्यासाठी तुम्हाला डीमॅट आणि ट्रेडिंग खाते लागेल. सर्व प्रथम डिमॅट आणि ट्रेडिंग खात्यांची सुविधा देणा-या स्टॉक ब्रोकरची निवड करा. केवायसीचे नियम (ग्राहकाची माहिती करून घ्या) पूर्णपणे पाळा. पडताळणी प्रक्रिया पूर्ण करा आणि सज्ज व्हा.
तुमच्या स्टॉक गुंतवणुकीसाठी बजेट निश्चित करा: बजेट निश्चित करणे हा गुंतवणुकीचा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे. शेअर्समध्ये गुंतवणुकीच्या सुरुवातीला तुम्ही किती पैसा गुंतवू शकता, हे निश्चित करावे लागेल. एकदाच एकरकमी वार्षिक गुंतवणूक करायची की, मासिक आधारावर गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल, हे पहावे लागेल. हे बजेट एकंदरीतच तुमच्या गुंतवणूक उद्दिष्टावर व ती कशी साध्य करायची यावर अवलंबून याठिकाणी तुम्ही अवास्तव अपेक्षा टाळल्या पाहिजे. उदा. २०% किंवा त्यापेक्षा जास्त परताव्याची अपेक्षा करणे.
निफ्टीमध्ये गुंतवणूक: एकदा तुम्ही सर्वकाही निश्चित केले की, तुम्ही निफ्टीसारख्या निर्देशांकासाठी सज्ज व्हाल. हे करण्याचे असंख्य मार्ग आहेत.
१. स्पॉट ट्रेडिंग:
निफ्टीमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे निफ्टी स्क्रिप्स खरेदी करणे. एकदा आपण हे केल्यास, किंमत वाढते तेव्हा भांडवलाच्या नफ्यातून आपण लाभ मिळवू शकतो.
२. डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग: डेरिव्हेटिव्ह्ज हे आर्थिक करार असतात, जे मूलभूत मालमत्तेपासून मूल्य कमावतात. हे स्टॉक्स कमोडिटीज, चलन, इत्यादी असू शकतात. या पद्धतीत, पक्ष भविष्यातील तारखेला कराराची पूर्तता करण्यास आणि अंतर्निहित मालमत्तेच्या भावी मूल्यावर पैज लावून नफा कमावण्यास सहमत असतात. निफ्टी इंडेक्समध्ये ट्रेडिंग करण्यासाठी तुमच्याकडे दोन डेरिव्हेटिव्हची साधने असतात.
निफ्टी फ्युचर्स: साध्या भाषेत, भविष्यातील करार हे खरेदीदार आणि विक्रेते यांच्यादरम्यान भविष्यातील निफ्टी लॉट खरेदी करण्याबाबतचे करार असतात. या कराराच्या कालावधीत, किंमत उंचावल्यास, तुम्ही स्टॉक विकू शकतात आणि लाभ कमावू शकतात. मूल्य कमी झाल्यास, तुम्ही सेटलमेंटच्या तारखेपर्यंत थांबू शकतात.
निफ्टी ऑप्शन: ठराविक किंमतीत भविष्यातील निफ्टी लॉटच्या ट्रेडिंगसाठी खरेदीदार आणि विक्रेते यांच्यादरम्यान झालेला करार हा ऑप्शन करार असतो. प्रीमियम वसूल करून ऑप्शन करारातील खरेदीदार कायदेशीर अधिकार मिळवतो. तथापि, किंमत त्यांच्या फायद्याची असेल तेव्हा खरेदी किंवा विक्री करण्याचे बंधन त्यांच्यावर नाही.
३. इंडेक्स फंड्स: हा पोर्टफोलिओ (स्टॉक्स, बाँड्स, इंडायसेस, करन्सीज, इत्यादी) असलेल्या म्युच्युअल फंड्सचा प्रकार आहे. मार्केट इंडेक्स (स्टॉक्स व त्यांच्या किंमतीतील चढ-उतार) च्या घटकांचा मागोवा घेण्यासाठी किंवा त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी तयार केला आहे. याद्वारे विस्तृत मार्केट एक्सपोजर मिळते. हे फंड्स निफ्टीसह विविध निर्देशांकात गुंतवणूक करतात.
निफ्टी निर्देशांक आणि स्टॉक मार्केटमधील वृद्धीने सध्या अनेक रिटेल गुंतवणूकदार, संस्थात्मक तसेच विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. ते त्यांचा पैसा थेट किंवा त्यांच्या इंडेक्स फंड्सद्वारे गुंतवत आहेत. गुंतवणूक करताना उपरोक्त मुद्दे लक्षात ठेवावेत, मग पुढे जाण्यासाठी तुम्ही सज्ज व्हाल.

36 total views, 1 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *