जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. कैलास पवार ठरले लसीकरणाचे पहीले लाभार्थी

ठाणे जिल्ह्यात  कोविड लसीकरणास प्रारंभ

ठाणे : ठाणे  जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हा सामान्य रुग्णालय येथे करण्यात आला. जिल्ह्यामध्ये लसीकरण मोहिमेतील पहिले लाभार्थी होण्याचा मान  जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. कैलास पवार यांना मिळाला.
जिल्हा सामान्य रुग्णालय या लसीकरण केंद्रामध्ये आयोजित या कार्यक्रमास जिल्हा  परिषद अध्यक्ष सुषमा लोणे,  जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषद आरोग्य सभापती कुंदन पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते,  अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे, आरोग्य विभागाच्या  उपसंचालक डॉ.गौरी राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे, लसीकरण मोहिमेचे समन्वयक डॉ. जळगावकर व आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 453 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.