वेदांत वॉरीयर्स ठरला प्रभादेवी क्रिकेट प्रिमिअर लीगच्या पाचव्या पर्वाचा विजेता

रोहित रुद्राने पटकाविला मालिकावीर, मालिकेतील सर्वोत्तम गोलंदाज व सामनावीराचा किताब

मुंबई : वेदांत वॉरियर्सने सिद्धिविनायक पँथरचा १०गडी राखून पराभव करीत प्रभादेवी स्पोर्ट्स क्लब आयोजित क्रिकेट लीगच्या ५व्या पर्वाचे विजेतेपद पटकाविले. विजेत्या संघाला गीत-संगीत व व्यंगचित्रकार श्रीकांत ठाकरे चषक व रोख ३०,००० रुपयांचे बक्षीस पटकाविले. उपविजेत्या सिद्धिविनायक पँथर संघाला प्रभादेवी चषक व २०,००० रुपयांच्या रोख पुरस्कारावर समाधान मानावे लागले.
दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या या लीग क्रिकेट स्पर्धेत नाणेफेक जिंकत वेदांत वॉरीयर्सने सिद्धीविनायकला फलंदाजी करिता पाचारण केले. सिद्धीविनायकचा डाव ५ बाद १८ धावावर आटोपला. रोहित रुद्रने २, विराज कोडमकार आणि विकी सिंग यांनी प्रत्येकी १ फलंदाज बाद केला. एक धावचित झाला. या बदल्यात वेदांत वॉरीयर्सने एकही गडी न गमविता १९ धावा करीत सहज विजेत्यापदावर प्रथमच आपले नाव कोरले. रोहितने ९, तर विराजने १० धावा केल्या. रोहित रुद्राचा अष्टपैलू खेळ, त्याला विकी सिंग व विराज कोडमकार यांची मिळालेली गोलंदाजी व फलंदाजीत योग्य साथ यामुळे हा विजय सोपा गेला.
वेदांत रुद्राने मालिकावीर, मालिकेतील सर्वोत्तम गोलंदाज व सामनावीर हे किताब पटकावत या स्पर्धेवर आपला ठसा उमटविला. रिया इलेव्हनचा निशांत शिवलकर ठरला स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज ठरला. या सर्वांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.

 608 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.