इकोड्राईव्ह यंगस्टर फाउंडेशनचा पालिकेकडे पत्रव्यवहार, मृत प्राणी, पक्षांसाठी अधिकृत दफनभूमी तयार करण्याची केली मागणी
कल्याण : महानगरपालिका क्षेत्रात पतंग उडवण्यासाठी नायलॉन आणि चिनी मांज्या मोठ्या प्रमाणात विकला जात आहे. या मांज्यामुळे मोठ्या प्रमाणात पक्षी जखमी होत आहेत त्याचबरोबर मृत्यु पावत आहेत. त्यामुळे या अनधिकृतपणे मांज्या विकणाऱ्या लोकांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी इकोड्राईव्ह यंगस्टर फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे त्याचबरोबर मांजा विक्री करणाऱ्या लोकांचा परवाना तात्काळ रद्द करण्याची विनंती देखील संस्थेने केली आहे.
तसेच सध्याची बर्ड फ्लू संदर्भात उपलब्ध असलेली माहिती लक्षात घेता महानगरपालिका क्षेत्रात मृत प्राणी, पक्षांसाठी कोणत्याही प्रकारची अधिकृत दफनभूमी नाही त्यामुळे कोणत्याही दुर्घटनेत मृत पावलेल्या प्राणी आणि पक्षांना इतरत्र किंवा रस्त्यांच्या कडेला किंवा अडगळीच्या ठिकाणी फेकून दिले जाते. अत्यंत संवेदनशील असलेल्या या मुद्यावर आयुक्तांनी तात्काळ कारवाई करावी व लवकरात लवकर प्राणी आणि पक्षांसाठी तात्काळ दफनभूमी उपलब्ध करून द्यावी ही मागणी संस्थेने केली असल्याची माहिती महेश बनकर यांनी दिली.
530 total views, 1 views today