डोळखांब येथे मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर संपन्न

शिबिरात चारशे पेक्षा जास्त रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
शहापूर : नवयुवा शक्ती संस्था व रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने डोळखांब परीसरातील चोंढे येथे मोफत आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी चारशे पेक्षा जास्त रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
संपूर्ण राज्यभर मोफत आरोग्य शिबीरे भरवून ती यशस्वी करण्यात हातखंडा असलेले रेड स्वस्तिक सोसायटीचे राज्य जनसंपर्क संचालक प्रमोद नांदगावकर यांच्या प्रयत्नांतून नवयुवा शक्ती संस्था व रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने डोळखांब परीसरातील घाटघर जलविद्युत प्रकल्प चोंढे येथे मोफत आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यास स्थानिक ग्रामपंचायत व वनविभागाने उत्तम सहकार्य केले. या शिबिरात उपजिल्हा रुग्णालय- शहापूर,आयुर हॉस्पिटल- कल्याण,आय केयर वी केयर- कल्याण, सरस्वती कॉस्माडेट डेंटल क्लिनिक- उल्हानगर या हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टरांनी ४१० पुरुष, स्त्रिया, युवक, युवतीं, लहान मुले व जेष्ठ नागरिक यांची मोफत आरोग्य तपासणी केली.
यावेळी चोंढे जलविद्युत प्रकल्पचे कार्यकारी अभियंता मढावी,अतिरिक्त कार्यकारी अभियंता काशिव,सहाय्यक अभियंता,सोनावणे,नाईक,वनपरिक्षेत्र अधिकारी डोळखांब प्रशांत निकाळजे,जिल्हा परिषद सदस्या संगीता गांगड ,रेड स्वस्तिक सोसायटीचे प्रमोद नांदगावकर आदी उपस्थित होते.
जीवन ज्योत ड्रग बँक मुंबई व नवयुवा शक्ती शहापूर यांनी परिसरातील १५० आदिवासी बांधवांना ब्लॅंकेट वाटप केले.
वनपाल जयवंत फर्डे,माजी सैनिक मंगेश रंगनाथ धिमते यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून वन वणव्या बाबत जनजागृती केली. सहाय्यक वनसंरक्षक रामकृष्ण पाटील शिबाराच्या नियोजनाचे कौतुक केले.

 572 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.