वारकरी सांप्रदाय तालुका अध्यक्षपदी बुधाजी मांजे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून वारकरी तसेच सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी व पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचा मानस केला व्यक्त

शहापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वारकरी सांप्रदाय तालुका अध्यक्षपदी ह.भ.प.बुधाजी मांजे यांची नियुक्ती करण्यात आली.प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने राष्ट्रवादीचे ठाणे (ग्रा) जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे यांच्या हस्ते मांजे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाने सोपवलेल्या जबाबदारीचे भान ठेऊन शरद पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करील. तसेच राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व जिल्ह्याचे प्रभारी जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून वारकरी तसेच सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी व पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचा मानस बुधाजी मांजे यांनी व्यक्त केला.यावेळी पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान सर्व धर्मीयांतील समाज बांधवांना सोबत घेऊन जाणारे व समाजसेवेची नितांत आवड असणारे हभप बुधाजी मांजे यांच्या निवडीने त्यांचे हितचिंतक आनंद व्यक्त करीत आहेत.

 453 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.