पत्रकार दिनी पनवेलमधील पत्रकारांनी जपली सामाजिक बांधिलकी

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने खैरवाडी (फणसवाडी) येथे जीवनाश्यक वस्तूंचे केले वाटप.

पनवेल : पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पनवेल तालुक्यातील अतिदुर्गम भागातील फणसवाडी (खैरवाडी) येथील आदिवासी बांधवांना अन्नधान्य वाटपाचा मदत कार्यक्रम करण्यात आला. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या या ठिकाणी असणाऱ्या आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून पनवेलमधील पत्रकारांकडून एक अनोखा संदेश देण्यात आला. आजही पत्रकार दिनाला प्रसिद्ध नेत्याला बोलावून चमकोगिरी करण्याचे फॅड सुरू असून यामध्ये स्वतःची प्रसिद्धी करून घेण्यासाठी अनेक स्वयंघोषित पत्रकार धडपडत असतात मात्र पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीने पत्रकार दिनी समाजाची सेवा करून एक वेगळा आदर्श निर्माण करून दिला आहे. यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे जेष्ठ सल्लागार माधवराव पाटील, प्रमोद वालेकर, अध्यक्ष रत्नाकर पाटील, उपाध्यक्ष केवल महाडिक, कार्याध्यक्ष संजय कदम, सचिव रवींद्र गायकवाड, सहसचिव सुधीर पाटील, खजिनदार हरेश साठे, सदस्य विवेक पाटिल, विशाल सावंत, प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. मनोहर सचदेव, रवींद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी व सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

 363 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.