रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या पत्रकारांनाचा नगरसेवक भरत चव्हाण यांच्या हस्ते गौरव
ठाणे : कोरोना संकटात जीवावर उदार होऊन रस्त्यावर उतरून वृत्तसंकलन करणाऱ्या तसेच कोरोना बाधित होऊन त्यावर मात करणाऱ्या ठाण्यातील पत्रकार आणि डॉक्टरांचा “कोरोना योद्धा” म्हणून सन्मान करण्यात आला. ठाण्यातील कोपरी येथे न्यू गावदेवी भाजी मार्केट आणि तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने नवकुंडीय महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आयोजक तथा भाजपचे स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण यांच्या हस्ते पत्रकार आणि डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.
गेली १० महिने कोरोना सारख्या आजाराने सर्वांना त्रस्त केले आहे. यामध्ये रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकार तसेच सामान्य नागरिकासाठी अविरतपणे कोपरीमधील डॉक्टरांना सत्कार करण्यात आला असून प्रमानपत्र देण्यात आले. या कार्यक्रमात ठाण्यातील १० पत्रकार तसेच २० डॉक्टरांना सत्कर करण्यात आले. पत्रकार संजय पितळे,आनंद कांबळे,जितेंद्र कालेकर,प्रमोद खरात,कपिल राऊत,गणेश थोरात, छायाचित्रकार गजानन हरीमकर, दीपक कुरकुंडे, मनीष पोळेकर, संदीप खर्डीकर यांचा सत्कर करण्यात आला. तसेच कोरोना काळात रुग्णांना उपचार करून मानसिक आधार देणाऱ्या डॉक्टरांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कोरोनाची भीती असताना देखील अनेक पत्रकारांनी आणि डॉक्टरांनी आपले कर्तव्य बजावले आहे. समाजाचे काहीतरी देणे आपण लागतो तसेच कौतुकाची थाप मिळवली हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या सत्काराचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजक भरत चव्हाण यांनी सांगितले.
कोरोना संकट असल्याने यंदा आरोग्य शिबिर
दरवर्षी प्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात देवीच्या उत्सवाचे आयोजन करण्यात येते, यंदाचे १५ वे वर्ष असून दरवर्षी सामाजिक, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाचे कोरोनाचे संकट बघता यावर्षी आरोग्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून महाआरोग्य शिबिर,मोफत औषध वाटप,जेष्ठ नागरिकांची तपासणी, महारक्तदान शिबीराचे आयोजन यावर्षी करण्यात आले आहे.
516 total views, 1 views today