प्रदीर्घ आजारपणामुळे आज दुपारी घेतला शेवटचा श्वास
ठाणे : दैनिक लोकमतचे ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांच्या पत्नी आणि लेखिका मंगला भावे यांचे आज दुपारी एक वाजता प्रदीर्घ आजारामुळे निधन झाले. त्या ७७ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पतीसह विवाहित मुलगी मृदुला आणि नातू तनिष्कअसा परिवार आहे. गेली अनेक वर्ष मधुकर भावे ठाण्यातील वर्तक नगर जवळील समता नगर येथे आपली मुलगी मृदुलाकडे राहत होते. त्यांच्या पत्नी मंगला भावे या गेली चार वर्षे आजारी होत्या. हृदयविकार, डायबिटीस किडनीच्या आजारामुळे त्या त्रस्त होत्या. एक आठवड्यापूर्वी रुग्णालयातून घरी परत आल्या होत्या गेल्या रविवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. आज दुपारी एक वाजताच्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले त्यांच्या पार्थिवावर वागळे इस्टेट येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगला भावे यांनी आक्रोश नावाचे पुस्तक लिहिले होते. लोकमत या दैनिकाची स्थापना झाल्यानंतर मधुकर भावे यांनी संपादक पदाची जबाबदारी संभाळली होती मुंबई , औरंगाबाद, नागपूर, सोलापूर आदी ठिकाणी त्यांनी काम केले. त्यानंतर काही काळ त्यांनी प्रहार दैनिकाचे संपादकपद सांभाळले होते.
506 total views, 4 views today