राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसची आढावा बैठक संपन्न

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत विद्यार्थी कॉंग्रेस पूर्ण ताकदीनिशी काम करणार – प्रसाद महाजन

कल्याण : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कल्याण डोंबिवली शहर जिल्हा कार्यकारीणीची आढावा बैठक माळी समाज हॉल रामदासवाडी कल्याण पश्चिम येथे नुकतीच पार पडली. कल्याण डोंबिवली शहर विद्यार्थी जिल्हाअध्यक्ष प्रसाद महाजन यांनी या बैठकीचे केले होते.
या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ शिंदे, कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे आदींनी उपस्थितांना आगामी निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी विद्यार्थी संघटनेची वार्ड प्रमाणे बूथ बांधणी करण्यास सांगितले. कोरोना काळात विद्यार्थी कॉंग्रेसने केलेल्या मदत कार्याची दखल देखील त्यांनी घेतली. त्याचप्रमाणे उर्वरित वार्ड कमिटी स्थापन करण्याचे आदेश देखील दिले.
यावेळी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रसाद महाजन यांनी ३० जानेवारी २०२० पासून केलेल्या कामाचा आढावा उपस्थितांना दिला. यामध्ये कोरोना काळात दररोज ५०० लोकांना एक महिना जेवण वाटप, २५० लोकांना धान्यकीट वाटप, २५०० मास्क आणि सॅनिटायझर वाटप केले. विद्यार्थी कॉंग्रेसची जिल्हा कमिटी, विधानसभा कमिटी पूर्ण झाली असून आगामी काळात वार्ड कमिटीची नियुक्ती देखील लवकरच करण्यात येणार असून कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत विद्यार्थी कॉंग्रेस पूर्ण ताकदीनिशी काम करणार असल्याचे प्रसाद महाजन यांनी सांगितले.    
 यावेळी माजी जिल्हा अध्यक्ष रमेश हनुमंते, विजय चव्हाण, उदय जाधव, स्वप्निल रोकडे, हेमंत मिरकुटे, वरुण गायकर, सुरज भगत, विधानसभा पदाधिकारी रोहण साळवे, कुणाल भंडारी, केतन जगताप,नितेश पाटील,आदीत्य चव्हाण, अवीका राणे, प्रथमेश चव्हाण तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 543 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.