३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ते १ जानेवारी सकाळी ६ वाजेपर्यंत कल्याण वाहतूक उप विभागाकडून कल्याण शहर हद्दीमध्ये दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या एकूण २४ वाहन चालकांवर मोटर वेहिकल कायदा १८५ प्रमाणे कारवाई करण्यात आली असून त्याच प्रमाणे दारू पिऊन गाडी चालविण्यास प्रवृत्त करणाऱ्या एकूण ७ जणांवर कलम १८८ प्रमाणे कारवाई करण्यात आली. यामध्ये एकूण एक चारचाकी गाडीसह ३० दुचाकीताब्यात घेण्यात आल्या आहेत.
कल्याण : २०२० या सरत्या वर्षाला निरोप देतांना कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक जणांनी कायद्याचा भंग केला. यामध्ये दारू पिऊन गाडी चालविणाऱ्या १०४ तळीरामांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे.
३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ते १ जानेवारी सकाळी ६ वाजेपर्यंत कल्याण वाहतूक उप विभागाकडून कल्याण शहर हद्दीमध्ये दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या एकूण २४ वाहन चालकांवर मोटर वेहिकल कायदा १८५ प्रमाणे कारवाई करण्यात आली असून त्याच प्रमाणे दारू पिऊन गाडी चालविण्यास प्रवृत्त करणाऱ्या एकूण ७ जणांवर कलम १८८ प्रमाणे कारवाई करण्यात आली. यामध्ये एकूण ३० दुचाकी, एक चारचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे कोळसेवाडी विभागात २३ आणि डोंबिवली विभागात ५० दारू पिऊन गाडी चालविणाऱ्यांवर आणि त्यांच्या सहप्रवाशांवर कारवाई करण्यात आली.
वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त बाळासाहेब पाटील, सहा.पोलीस आयुक्त कल्याण वाहतूक विभाग.उमेश माने-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण वाहतूक उप विभागाचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील, १ एपीआय, १ पीएसआय, ८ पोलीस हवालदार, पोलीस नाईक, ४ पोलीस शिपाई १० आणि ८ वॉर्डन यांच्यामार्फत हि कारवाई कल्याण मधील दुर्गाडी चौक, पोर्णिमा चौक, महात्मा फुले चौक, सुभाष चौक, रेल्वे स्टेशन परिसर आदी ठिकाणी करण्यात आली.
464 total views, 2 views today