कॉंफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सची अर्थमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : जीएसटी मध्ये वेळोवेळी करण्यात आलेले बदलांमुळे जीएसटी लागू करण्याचा मूळ उद्देशच मागे पडत चालला आहे. त्यामुळे देशातील व्यापाऱ्यांसाठी जीएसटी करप्रणाली डोकेदुखी ठरते आहे. देशातील बहुतेक व्यापाऱ्याकडे स्वतःची संगणिकृत यंत्रणा नाही आहे.त्यामुळे किचकट असलेली जीएसटी करप्रणाली वापरताना व्यापाऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे कॉंफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) नुकतेच जीएसटीच्या नियमात केलेले बदल रद्द करून तीन मुद्द्यांवर व्यापाऱ्यांशी चर्चा करावी अशा मागणीचे पत्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पाठवले असल्याचे कॅटचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी वेल्फेअर संघाचे अध्यक्ष सुरेशभाई ठक्कर यांनी सांगितले.
अर्थमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात करप्रणाली साधी सरळसोपी करावी जेणेकरून व्यपाऱ्यांना त्याचा त्रास होणार नाही. जीएसटी करप्रणालीचा विस्तार आणि केंद्र तसेच राज्य सरकारला आवश्यक तो महसुल कसा मिळवून देता येईल या तीन मुद्द्यांवर व्यापाऱ्यांशी चर्चा करावी अशी मागणी केली असल्याचे सुरेशभाई ठक्कर म्हणाले. जीएसटीच्या प्रश्नांवर सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी वाद घालण्यापेक्षा चर्चा करण्याची कॅटची तयारी आहे. त्यामुळेच जीएसटीच्या नुकत्याच जारी करण्यात आलेल्या अधियमानांना स्थगित करावे आणि चर्चा सुरू करावी असे सुरेशभाई ठक्कर यांनी सांगितले.
489 total views, 1 views today