नौपाडा येथील ११९ कामगारांचा कोविड योद्धा म्हणून गौरव

कोरोना महामारीत शहराची स्वच्छता कायम ठेवली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली दखल

ठाणे : शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसने ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील शाहू मार्केट, घंटाळी मंदिर आणि अत्रे कट्टा सफाई पेटीवर कार्यरत असलेल्या सुमारे ११९ सफाई कामगारांना कोविड योद्धा या पुरस्काराने सन्मानित केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ‘८दशके कृतज्ञतेची’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने कोरोनाच्या काळात ठाणे स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कामगारांचा ‘कोविड योद्धा’ या पुरस्कारने सन्मान करण्यात येत आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाडसाहेब यांच्या आदेशाने शहराध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली भास्कर कॉलनी येथे झालेल्या एका कार्यक्रमात नौपाडा भागातील शाहू मार्केट, घंटाळी मंदिर आणि अत्रे कट्टा येथे स्वच्छतेचे काम करणाऱ्या ११९ सफाई कामगारांना ‘कोविड योद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी ठाणे शहर सरचिटणीस रवींद्र पालव, ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष विजय भामरे, कार्याध्यक्ष महेंद्र पवार, महिला विधानसभाध्यक्षा कांता गजमल, परिवहन सदस्य नितीन पाटील, व्यापारी सेलचे शहर अध्यक्ष दीपक क्षत्रिय, लिगल सेलचे अध्यक्ष विनोद उत्तेकर, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष दिलीप नाईक, असंघटीत सेलचे अध्यक्ष राजू चापले, ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे,निलेश कदम, महिला ब्लॉक अध्यक्षा अनिता मोटे, वॉर्ड अध्यक्ष सुमीत गुप्ता, रवी साळुंखे, शिवा यादव, संतोष घोणे, संदीप ढोकलिया, दिनेश दळवी, साई प्रभू, विवेक गोडबोले, कुणाल भोईर, सचिव नारायण उत्तेकर, गौरव अरीर, शंकर पवार, गौतम मोरे, राजदत्त गावडे, विक्रांत चव्हाण, रसिका फणसे, संकेत नारणे आदी उपस्थित होते

 301 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.