वकील संघटनेकडून डॉ. जितेंद्र आव्हाड सन्मानित

गृहनिर्माण मंत्री म्हणून केलेले चांगले काम, कोरोना काळात केलेल्या लोकोपयोगी कामांची दखल घेऊन ठाणे बार असोसिएशन केला सत्कार

ठाणे : राज्यात गृहनिर्माण खात्याला स्वतंत्र ओळख मिळवून दिल्याबद्दल तसेच कोरोना काळात स्वत:च्या प्रकृतीची काळजी न घेता जनसेवेसाठी स्वत:ला वाहून दिल्याबद्दल डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा ठाणे बार असोसिएशनच्या वतीने सत्कार केला. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक अशरफ (शानू) पठाण आणि परिवहन सदस्य शमीम खान हे उपस्थित होते.
डॉ. जितेंद्र आव्हाड यांची महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहनिर्माण मंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. आपल्या मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अत्यंत वेगवान पद्धतीने कामे करुन चांगले निर्णय घेतले आहेत. तसेच, कोरोना काळात स्वत: रस्त्यावर उतरुन त्यांनी जनतेला अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. त्यातून त्यांनाही कोरोनाची लागण झाली. एवढ्या प्रचंड प्रमाणात जनसेवेला वाहून घेतल्याबद्दल ठाणे वकिल संघटना अर्थात बार असोसोशिएशनच्या वतीने डॉ. आव्हाड यांचा बार असोशिएशनमध्ये जंगी सत्कार करण्यात आला.

 529 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.