नेरुळ येथे रक्तदान शिबिर संपन्न

रक्तदात्यांचा मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद.

नवी मुंबई : नवी मुंबई शिवसेना आणि विजय नाहटा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २० डिसेंबर रोजी सेंट झेवीयर्स हायस्कूल नेरुळ (पूर्व) येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवसेना उपनेते तथा “मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ”चे सभापती विजय नाहटा यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी खासदार राजन विचारे शिवसेना नवी मुंबई शहरप्रमुख विजय माने, नवी मुंबई उपजिल्हा संतोष घोसाळकर, प्रकाश पाटील, अतुल कुलकर्णी, रोहिदास पाटील,शिवसेनेचे मनोहर गायखे,राष्ट्रवादी काँग्रेस’चे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे, ‘काँग्रेस’चे प्रदेश सरचिटणीस संतोष शेट्टी, माजी नगरसेवक राजू शिंदे,सोमनाथ वासकर,ज्ञानेश्वर सुतार, माजी नगरसेविका सलुजा सुतार, अरुण नलावडे, ‘उत्तर भारतीय सेल’चे जिल्हा संघटक कमलेश वर्मा, शिवसेना नवी मुंबई उपशहर प्रमुख रामाशेठ वाघमारे, संतोष मोरे,प्रदीप बी. वाघमारे, नेरुळ विभाग प्रमुख संजय भोसले, महिला उपजिल्हा संघटक उषा रेणके, महिला उप शहर संघटिक संगीता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर रक्तदान शिबीर स्थळी शिवसेना खासदार राजन विचारे यांनी भेट देऊन रक्तदात्यांचे तसेच आयोजकांचे कौतुक केले.
सध्या महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने राज्यातील जनतेने रक्तदान करावे, या राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आणि सामाजिक बांधिलकी जपत नवी मुंबई शिवसेना आणि विजय नाहटा फाउंडेशन यांच्या तर्फे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते,असे विजय नाहटा यांनी सांगितले.
रक्तदान शिबिरामध्ये नवी मुंबईतील शेकडो रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी उपशहर प्रमुख मनोज इसवे,संतोष मोरे,ज्ञानेश्वर सुतार, नेरुळ विभाग प्रमुख संजय भोसले,उपविभाग प्रमुख संजय मोरे,विनायक नाईक,संतोष पाटील,अरुण शेट्टी,विजय शिंदे,सचिन ढवळे,शाखा प्रमुख निनाद कदम,विजय कदम,मधुकर पुजारी,प्रदीप पाटील,सावन थोरात, उप शाखा प्रमुख आनंद नायर,एकनाथ इंदोरे,कुणाल निर्भवणे, युवा सेना पदाधिकारी विनायक चव्हाण,उपशाखा प्रमुख अरुण गजमल,प्रशांत साळवी,प्रवीण जमादार,सुजीत भोसले, महिला पदाधिकारी संगीता पाटील,विनिता नाईक,ज्योती लाड आणि ज्योती चिवे यांनी परिश्रम घेतले.

 498 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.