खोदा पहाड और निकला चूहा, किरीट सोमय्या यांच्या आरोपांवर प्रताप सरनाईक याचे उत्तर
ठाणे : विहंग गार्डन्स ही इमारत कायदेशीर प्रक्रियेत असून कोणत्याही प्रकारे अनधिकृत नाही, त्यामुळे माझी खोटी बदनामी केल्याप्रकरणी, किरीट सोमय्या यांच्या विरोधात कोर्टात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी आपल्यावरील आरोपांना उत्तर देताना सांगितले. कधी पाकिस्तानी कार्ड ,आणि इतर लोकांचे संबंध माझ्याशी जोडायचे तर कधी तानाजी मालुसरे यांची तुलना करून मला गोत्यात टाकण्याचे काम भाजप कडून होत आहे.मी शेवट पर्यंत ईडीच्या चौकशीला सामोरे जाईल असे देखील सरनाईक यांनी स्पष्ट केले. .
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन प्रताप सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप केले होते, सरनाईक यांनी बांधलेली विहंग गार्डन या बिल्डिंगला ओसी प्राप्त नसून, ती अनधिकृत असल्याने महापालिका आणि पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले होते, त्यावर प्रताप सरनाईक यांनी उत्तर दिले आहे.
१०० कोटी दाव्याच्या नोटीसचे “मी स्वागत करतो” – किरीट सोमय्या
प्रताप सरनाईक १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे मला समजले असून सरनाईकांच्या या नोटीसचे मी स्वागत करतो अश्या प्रकारेचे ट्विट भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी करून एकप्रकारे आवाहन दिले आहे.
547 total views, 3 views today