नागरिकांनी या शिबीरात सिकल सेल, सी.बी.सी.,शुगर, थायरॉईड आदी विविध प्रकारच्या तपासण्या करून घेतल्या.
कल्याण : कल्याण तालुक्यातील खडवली पंचक्रोशीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या माध्यमातून आरोग्य विषयक विविध प्रकारच्या मोफत तपासण्या करण्यात आल्या. या शिबीरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेकडो नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेत सिकल सेल, सी.बी.सी.,शुगर, थायरॉईड आदी विविध प्रकारच्या तपासण्या करून घेतल्या.
या कार्यक्रमाचे आयोजन जेष्ठ समाजसेवक आणि मनसे विभाग प्रमुख रुपेश खंडागळे यांनी केले होते. कार्यक्रमास खडवली प्राथमीक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खामकर तसेच आरोग्य सहाय्यक लिलाधर धिंधळे, लॅब टेक्नीशिअन लक्ष्मी गावीत, एल.बी.एम. मिलिंद वैरागी, लॅब असिस्टंट निरज शिंदे आणि आशा सविता कशिवले यांचे विशेष सहकार्य लाभले. ह्या कार्यक्रमाला मनसेचे दिनेश बेलकरे, लक्षमन भगत, राजाभाऊ लोणे, रुपेश कांबेरे, महेश कांबेरे, लक्ष्मण भोईर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
575 total views, 4 views today