ठाणे सिटी एफ सी तर्फे फुटबॉल निवड चाचणी


१८ वर्षाखालील मुलांना मिळणार विविध स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी
ठाणे : ठाणे सिटी एफ सी तर्फे विविध फुटबॉल स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी १८ वर्षाखालील मुलांच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. निशुल्क असलेल्या या निवड चाचणीत सन २००३, ०४, ०५ साली जन्मलेल्या मुलांना सहभागी होता येईल. डोंबिवलीतील पलावा सिटी येथे २३ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून आणि ठाण्यातील गावंड बाग मैदानावर २६ डिसेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजल्यापासून हि चाचणी होईल. या निवड चाचणीत ठाणे, मुलुंड, कल्याण डोंबिवली येथील मुलांना सहभागी होता येईल. चाचणीत भाग घेण्यासाठी आगाऊ नाव नोंदणी करणे बंधनकारक असून इच्छुकांनी https://forms.gle/PeQWoux71cr4Kue59 या लिंकवर आपली नावे नोंदवावीत.

 324 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.