कुपोषण निर्मूलनासाठी ग्राम बाल विकास केंद्र व दत्तक पालक अभियान प्रभावीपणे राबवा

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

ठाणे : जिल्हयाच्या ग्रामीण भागातील कुपोषण कमी करण्यासाठी ग्राम बाल विकास केंद्र व दत्तक पालक अभियान प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी दिले. यशवंतराव चव्हाण सभागृहात महिला व बाल विकास विभागाने, बाल विकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, व पर्यवेक्षकांच्या आढावा सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ.दांगडे यांनी महिला बाल विकास विभागामार्फत राबविल्या जाणा-या विविध योजनांमध्ये ठाणे जिल्हा अग्रेसर राहील यासाठी प्रयत्नशील राहण्यास सांगितले. तसेच ठाणे जिल्हा हा मुंबईच्या जवळ जिल्हा असून जिल्ह्यात सध्या ११८ सॅम बालक आहेत. ही बाब गंभीरपणे घेऊन हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयन्त करणे गरजेचे असल्याचे नमूद करून सर्वांनी एकत्रितपणे सॅम बालकांना दत्तक घ्या. व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी प्रत्येक महिन्याला बिट मधील किमान एकातरी अंगणवाडीला भेट देण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी ( महिला व बाल विकास) संतोष भोसले उपस्थित होते.

 433 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.