शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त राबवला उपक्रम
कल्याण : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कल्याणमध्ये राष्ट्रवादी अर्बन सेलचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य प्रविण मुसळे यांच्या वतीने देशी ८० रोपांची लागवड करण्यात आली.
कल्याण पश्चिम परिसरातील महापालिकेचे गार्डन व हौऊसिंग सोसायटीस मध्ये हा सामाजिक उपक्रम करण्यात आला. या सामाजिक उपक्रमात श्री खोपडे, विसपुते, मुसळे, दांडवेकर, काळे, चौधरी, संदीप वाकचौरे, मंगेश वाकचौरे, बलवंत खंडेलवाल, स्टॅनली डिमेलो, समृध्दि, संस्कृती, अधिरा आणि अधिराज आदींचे सहकार्य लाभले.
सामाजिक कार्याद्वारे शरद पवार यांचा वाढदिवस साजरा व्हावा आणि समाजाला काहीतरी याचा फायदा व्हावा या उद्देशाने या ८० रोपांची लागवड करण्यात आली असून या रोपांची निगा राखण्यात येऊन या रोपांची मोठी वृक्ष झाल्यास पर्यावरणाचा समतोल राखला जाऊन नागरिकांनाच याचा फायदा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी अर्बन सेलचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य प्रविण मुसळे यांनी दिली.
465 total views, 1 views today