पालिका कर्मचारी,अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी लवकरात लवकर करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नजीब मुल्ला यांचे आयुक्तांना पत्र

ठाणे : ठाणे महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी यांना ७ व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी द्या अशी मागणी राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला यांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यासाठी महासभेने ९ ऑगस्ट,२०१९ ला मंजुरीही दिली. मात्र अद्याप कर्मचारी याना ७ वेतन आयोग लागू करण्यात आला नाही. पालिका आयुक्त आणि नजीब मुल्ला यांच्या दालनातील चर्चेनुसार ७ व वेतन आयोग लागू करावा. अशी मागणी केली आहे.
ठाणे महापालिकेच्या सेवेत काम करणाऱ्या अभियंता संवर्गाला खूप कमी वेतनश्रेणी आहे. तसेच ६ व्या वेतन आयोगामध्ये तर काही संवर्गाच्या ग्रेड पे संदार्भातील त्रुटी आस्थापना विभागाकडून अद्याप दूर करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ७ व्या आयोगाच्या अंमलबजावणीसाठी अडचणी निर्माण होत आहेत.या संवर्गाच्या पे ग्रेड मध्ये असलेल्या त्रुटी दूर करून ७ वा वेतन आयोगानुसार वेतन निश्चित करणे गरजेचे आहे. ६ व्या वेतन आयोगातील त्रुटी दूर केल्याने कर्मचारी अधिकारी यांच्यावरील अन्याय दूर होऊन त्यांना न्याय मिळेल याशिवाय, बृहनमुंबई महापालिकेसह अन्य काही महापालिकांनी ७ व्या वेतन आयोगाची अमलबजावणी केली आहे.तेव्हा ठाणे महापालिकेच्या कर्मचारी याना ७ व्या वेतन आयोगाची तात्काळ अंमलबजावणी करून जानेवारी २०२१ पासून वेतन देण्याची कार्यवाही करावी. अशी मागणी नजीब मुल्ला यांनी केली आहे.

 774 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.