राज्यपालांना सांगा की ती यादी मंजूर करायला

भाजपाच्या मुनगंटीवारांच्या मागणीवर संसदीय कार्यमंत्र्यांचे प्रतित्त्युर

मुंबई : जनतेच्या प्रश्नांची तड लावण्यासाठी विधिमंडळाकडून विविध समित्या तयार करण्यात आल्या. मात्र या समित्यांच्या बैठका अद्याप आयोजित केली नसल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून देत सरकार लोकशाहीला बेशुध्द करण्याचे काम करत असल्याचा आरोप भाजपा नेते सुधीर मुंनगंटीवार यांनी केला. त्यावर सांसदिय मंत्री अनिल परब यांनी आम्ही बैठकांचे आयोजन करू तुम्ही तेवढे राज्यपालांना सांगून ती १२ आमदारांची याची मंजूर करायला सांगा की अशी मागणी केली. त्यावर अखेर विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी हा सभागृहाच्या बाहेरचा विषय असल्याचे सांगत या प्रकरणावर पडदा टाकला.
राज्यातील प्रश्नांची त़ड लावण्यासाठी विधानसभेतील विविध पक्षांच्या आमदारांच्या अध्यक्षतेखाली समित्या तयार येतात. मात्र या समित्यावर समिती प्रमुखाची आणि सदस्यांची नियुक्तीही केली. मात्र प्रथेप्रमाणे समितीप्रमुखांना सदस्यांची यादी दिली नाही की, त्यांच्या बैठका आयोजित केल्या जात नसल्याने या समितीच्या बैठका आयोजन करा अशी मागणी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी करत या बैठकांचे आयोजन केले जात नसल्याने लोकशाहीला बेशुध्द करण्याचे काम सरकारकडून सुरु असल्याचा आरोप केला.
त्यावर शिवसेनेचे नेते तथा सांसदिय कार्यमंत्री अनिल परब यांनी आम्ही तुमच्या बैठका आयोजित करू मात्र सरकारने राज्यपालांकडे पाठविलेली १२ नामनिर्देशित आमदारांची यादी मंजूर करायला सांगा असे प्रतित्त्युर देत भाजपा नेते मुनगंटीवार यांच्या आरोपातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला.
त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल काय पक्षाचे ऐकतात का? असा सवाल करत चर्चेला तोंड फोडण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वीच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी हा विषय सभागृहाच्या बाहेरचा असल्याचे सांगत संभावित वादावर पडदा पडला.

 317 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.