कोरोनाच्या आपत्तीपासून बचाव करण्यासाठी देण्यात आली भेट
कल्याण : छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित, नूतन माध्यमिक विद्यालय कल्याण पश्चिम येथे आरएसपी युनिट कमांडर मनीलाल शिंपी व समाजसेवक प्रवीण तिलक यांच्या सहकार्याने कोरोना आपत्तीपासून बचाव करण्यासाठी इलेक्ट्रिक सॅनिटायझर मशीन शाळेत भेट देण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापिका सय्यद व संस्थेचे अध्यक्ष सरचिटणीस अनिल पांचाळ यांना भाजपा आघाडी प्रदेश प्रभारी अध्यक्ष अनिल बोरनारे यांच्याहस्ते हि मशीन देण्यात आली. संस्थेचे सदस्य मिलिंद कुलकर्णी यांचा हस्ते मशीन टेस्टिंग करण्यात आले. यावेळी शाळेचे पर्यवेक्षक व आरएसपी अधिकारी महादेव क्षीरसागर, जितेंद्र सोनवणे, बापू शिंपी, अनंत किणगे, राजेंद्र गोसावी, बन्सीलाल महाजन, एनसीसी लीडर माळी उपस्थित होते. मुख्याध्यापिका सय्यद यांनी सर्वांचे आभार मानले.
454 total views, 1 views today