गावठाण जागेच्या मोजणीसाठी घोंगवणार ड्रोन !

गावठाण जागेत राहणाऱ्याना मिळणार प्रॉपर्टी कार्ड

शहापूर (शामकांत पतंगराव ) : जमिन मोजणीची प्रक्रिया किचकट असते. वेळ व मणुष्यबळ देखील मोठय़ा प्रमाणावर लागते. त्यावर उपाय म्हणून आता शासनाने गावांचे सिमांकन आणि गावठाण मोजणीसाठी थेट ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. या पद्धतीद्वारे एका गावाचे गावठाण अवघ्या एका दिवसात मोजले जाणार आहे.
ग्रामपंचायतीच्या मालकी हक्कात येणाऱ्या गावठान जमीनीची ड्रोनद्वारे मोजणी होऊन, त्या जागेत वर्षानुवर्षे घर बांधूंन राहणाऱ्या गरीब कुटुबांना त्या जागेचा मालकी हक्क देण्यासाठी शासनाने त्या रहिवाशांना राहत्या घराचे प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी तयारी सुरु केली असून ,ह्या कार्यक्रमाची सुरवात कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यातील शहापुर तालुक्यात सर्वप्रथम होणार असल्याने गावठान जागेत राहणाऱ्या गोर गरीब आदिवासी रहिवाशांनी या योजनेचे स्वागत करून आनंद व्यक्त केला आहे.
जानेवारी महिन्यात शहापुर तालुक्यात ड्रोनच्या मोजणीला सुरवात होऊन गावठान जागेत राहणाऱ्या कुटुबांची नोंद घेऊन त्यांना भूमिअभिलेख विभागा द्वारे प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार असल्याचे शहापुरचे भूमिअभिलेख उपअधिक्षक राजेंद्र लोंढे यांनी सांगितले.
शहापुर तालुक्यातील २२५ गावापैकी ८ गावांची मोजणी फार वर्षापूर्वी झाली असून २१२ ठिकाणी असलेल्या गावठान जमीनीची मोजणी होणार आहे.राज्याचे ग्रामविकास विभाग,भूमिअभीलेख विभाग यांच्या सयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवित असून सर्व्हे ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून ग्रामपंचयतीच्या गावठाण जमिनिची मोजणी होणार आहे.या योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत हद्दीतील घरांचे भूमापन करून मिळकत पत्रिका(प्रॉपर्टी कार्ड) अधिकार अभिलेख स्वरुपात मालमतेचे जीआईएस प्रणालीवर मालमत्ता पत्रक तयार करण्यात येणार आहे.शहापुर तालुक्यातील खर्डी, वासिंद, शहापुर, किन्हवली, मोखावणे,दळखण व आसनगाव येथील गावठाण मोजणी फार वर्षापूर्वी झाली असल्याचे भूमिअभिलेख विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
ग्रामपंचायत हद्दीतील घरांची नियमानुसार चौकशी करून त्यांचे मिळकत पत्रिका(प्रॉपर्टी कार्ड) व सनदा भूमिअभिलेख विभागामार्फ़त वाटप करण्यात येणार आहे.
जमिन मोजणीची प्रक्रिया किचकट असते. वेळ व मणुष्यबळ देखील मोठय़ा प्रमाणावर लागते. त्यावर उपाय म्हणून आता शासनाने गावांचे सिमांकन आणि गावठाण मोजणीसाठी थेट ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. या पद्धतीद्वारे एका गावाचे गावठाण अवघ्या एका दिवसात मोजले जाणार आहे.
गावठाण मोजणीच्या निमिताने प्रत्येक गावावर घिरट्या घालत ड्रोनचा आवाज घोंगावणार असून अशा प्रकारच्या हायटेक जमीन मोजणीची उत्कंठा मात्र सर्वांनाच लागून राहिली आहे.

 824 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.